Home / क्रीडा / Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा भीमपराक्रम! ख्रिस गेल आणि फिंचचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ मोडला

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा भीमपराक्रम! ख्रिस गेल आणि फिंचचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ मोडला

Abhishek Sharma World Record: आयपीएल 2026 च्या 31 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आपला विजयी वारु कायम राखत दिल्ली कॅपिटल्सवर 47...

By: Team Navakal
Abhishek Sharma Record
Social + WhatsApp CTA

Abhishek Sharma World Record: आयपीएल 2026 च्या 31 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आपला विजयी वारु कायम राखत दिल्ली कॅपिटल्सवर 47 धावांनी मात केली. हैदराबादच्या या दिमाखदार विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे सलामीवीर अभिषेक शर्मा.

अभिषेकने अवघ्या 68 चेंडूत नाबाद 135 धावांची तुफानी खेळी करत क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. या खेळीसह त्याने टी-20 क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत.

Abhishek Sharma World Record: गेल आणि फिंचचा विक्रम मोडीत

अभिषेक शर्माने या सामन्यात 130 पेक्षा जास्त धावा करण्याची किमया चौथ्यांदा साधली आहे. यासह त्याने अ‍ॅरॉन फिंच आणि ख्रिस गेल यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. या दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत टी-20 फॉरमॅटमध्ये प्रत्येकी 3 वेळा 130 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या, मात्र अभिषेकने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी हा टप्पा ओलांडून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

Abhishek Sharma World Record: सिक्सर किंगचा नवा अवतार

दिल्लीविरुद्धच्या डावात अभिषेकने 10 चौकार आणि 10 उत्तुंग षटकार खेचले. आयपीएलच्या इतिहासात दोनदा एकाच डावात 10 षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ख्रिस गेलने आयपीएलमध्ये 4 वेळा असा पराक्रम केला होता. अभिषेकने आतापर्यंत एकूण 5 टी-20 डावांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारले असून, या यादीत तो श्रेयस अय्यरला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

हैदराबादची विजयाची हॅट्ट्रिक

अभिषेकच्या 135 धावांच्या जोरावर हैदराबादने 20 षटकात 242 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ केवळ 195 धावांपर्यंतच मजल मारू शकला. हैदराबादने या विजयासह सलग तीन सामने जिंकून विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या चारपैकी तीन सामने गमावल्यानंतर हैदराबादने आता जोरदार पुनरागमन केले आहे.

येत्या 25 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात नियमित कर्णधार पॅट कमिन्स संघात परतणार आहे, ज्यामुळे हैदराबादची गोलंदाजी अधिक मजबूत होईल. सध्या अभिषेक शर्माचा फॉर्म पाहता हैदराबाद प्लेऑफमध्ये आपली जागा लवकरच निश्चित करेल असे दिसत आहे.

हे देखील वाचा – Mumbai Traffic Viral Video: ‘इथून चालते व्हा!’ मुंबईत ट्रॅफिकचा खोळंबा केल्याने महिलेने भाजपच्या मंत्र्यांना भररस्त्यात झापले; पाहा व्हिडिओ

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या