Home / क्रीडा / ICC T20 World Cup 2026 : क्रिकेटचा महासंग्राम! कधी सुरू होणार टी-२० विश्वचषक? पाहा संपूर्ण वेळापत्रक

ICC T20 World Cup 2026 : क्रिकेटचा महासंग्राम! कधी सुरू होणार टी-२० विश्वचषक? पाहा संपूर्ण वेळापत्रक

ICC T20 World Cup 2026: क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा लवकरच सुरू...

By: Team Navakal
ICC T20 World Cup 2026
Social + WhatsApp CTA

ICC T20 World Cup 2026: क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेच्या मैदानांवर या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. एकूण 20 संघ या जागतिक विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडतील. गतविजेता भारतीय संघाचा सलामीचा सामना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

सलामीचा दिवस आणि टीम इंडियाचे सामने

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारीला तीन सामने खेळवले जातील. श्रीलंकेतील कोलंबो येथे पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात पहिली लढत होईल. त्यानंतर कोलकात्यात वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड आमनेसामने येतील, तर रात्री मुंबईत भारत आणि अमेरिका यांच्यात हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे.

गट विभागणी (Groups)

  • गट A: भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड, नामिबिया.
  • गट B: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान.
  • गट C: इंग्लंड, वेस्ट इंडीज, नेपाळ, स्कॉटलंड, इटली.
  • गट D: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा.

स्पर्धेचे स्वरूप (Format)

स्पर्धेची विभागणी तीन टप्प्यांत करण्यात आली आहे. सुरुवातीला ‘गट फेरी’ होईल, जिथून प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ ‘सुपर 8’ मध्ये जातील. त्यानंतर ४-४ संघांचे दोन गट केले जातील. सुपर 8 मधील सर्वोत्तम दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. ८ मार्च रोजी स्पर्धेचा महाअंतिम सामना पार पडेल.

टी२० विश्वचषक २०२६: संपूर्ण वेळापत्रक (गट फेरी)

तारीखसामनावेळ (IST)मैदान
७ फेब्रुवारीनेदरलँड वि. पाकिस्तानसकाळी 11:00एसएससी, कोलंबो
७ फेब्रुवारीस्कॉटलंड वि. वेस्ट इंडीजदुपारी 3:00ईडन गार्डन्स, कोलकाता
७ फेब्रुवारीभारत वि. अमेरिकासंध्याकाळी 7:00वानखेडे, मुंबई
८ फेब्रुवारीअफगाणिस्तान वि. न्यूझीलंडसकाळी 11:00चिदंबरम, चेन्नई
८ फेब्रुवारीइंग्लंड वि. नेपाळदुपारी 3:00वानखेडे, मुंबई
८ फेब्रुवारीश्रीलंका वि. आयर्लंडसंध्याकाळी 7:00प्रेमदासा, कोलंबो
९ फेब्रुवारीस्कॉटलंड वि. इटलीसकाळी 11:00ईडन गार्डन्स, कोलकाता
९ फेब्रुवारीओमान वि. झिम्बाब्वेदुपारी 3:00एसएससी, कोलंबो
९ फेब्रुवारीकॅनडा वि. दक्षिण आफ्रिकासंध्याकाळी 7:00मोदी स्टेडियम, अहमदाबाद
१० फेब्रुवारीनामिबिया वि. नेदरलँडसकाळी 11:00अरुण जेटली, दिल्ली
१० फेब्रुवारीन्यूझीलंड वि. युएईदुपारी 3:00चिदंबरम, चेन्नई
१० फेब्रुवारीपाकिस्तान वि. अमेरिकासंध्याकाळी 7:00एसएससी, कोलंबो
११ फेब्रुवारीअफगाणिस्तान वि. दक्षिण आफ्रिकासकाळी 11:00मोदी स्टेडियम, अहमदाबाद
११ फेब्रुवारीऑस्ट्रेलिया वि. आयर्लंडदुपारी 3:00प्रेमदासा, कोलंबो
११ फेब्रुवारीइंग्लंड वि. वेस्ट इंडीजसंध्याकाळी 7:00वानखेडे, मुंबई
१२ फेब्रुवारीश्रीलंका वि. ओमानसकाळी 11:00पल्लेकेले, कॅन्डी
१२ फेब्रुवारीइटली वि. नेपाळदुपारी 3:00वानखेडे, मुंबई
१२ फेब्रुवारीभारत वि. नामिबियासंध्याकाळी 7:00अरुण जेटली, दिल्ली
१३ फेब्रुवारीऑस्ट्रेलिया वि. झिम्बाब्वेसकाळी 11:00प्रेमदासा, कोलंबो
१३ फेब्रुवारीकॅनडा वि. युएईदुपारी 3:00अरुण जेटली, दिल्ली
१३ फेब्रुवारीनेदरलँड वि. अमेरिकासंध्याकाळी 7:00चिदंबरम, चेन्नई
१४ फेब्रुवारीआयर्लंड वि. ओमानसकाळी 11:00एसएससी, कोलंबो
१४ फेब्रुवारीस्कॉटलंड वि. इंग्लंडदुपारी 3:00ईडन गार्डन्स, कोलकाता
१४ फेब्रुवारीन्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिकासंध्याकाळी 7:00मोदी स्टेडियम, अहमदाबाद
१५ फेब्रुवारीनेपाळ वि. वेस्ट इंडीजसकाळी 11:00वानखेडे, मुंबई
१५ फेब्रुवारीनामिबिया वि. अमेरिकादुपारी 3:00चिदंबरम, चेन्नई
१५ फेब्रुवारीभारत वि. पाकिस्तानसंध्याकाळी 7:00प्रेमदासा, कोलंबो
१६ फेब्रुवारीअफगाणिस्तान वि. युएईसकाळी 11:00अरुण जेटली, दिल्ली
१६ फेब्रुवारीइंग्लंड वि. इटलीदुपारी 3:00ईडन गार्डन्स, कोलकाता
१६ फेब्रुवारीऑस्ट्रेलिया वि. श्रीलंकासंध्याकाळी 7:00पल्लेकेले, कॅन्डी
१७ फेब्रुवारीकॅनडा वि. न्यूझीलंडसकाळी 11:00चिदंबरम, चेन्नई
१७ फेब्रुवारीआयर्लंड वि. झिम्बाब्वेदुपारी 3:00पल्लेकेले, कॅन्डी
१७ फेब्रुवारीस्कॉटलंड वि. नेपाळसंध्याकाळी 7:00वानखेडे, मुंबई
१८ फेब्रुवारीदक्षिण आफ्रिका वि. युएईसकाळी 11:00अरुण जेटली, दिल्ली
१८ फेब्रुवारीनामिबिया वि. पाकिस्तानदुपारी 3:00एसएससी, कोलंबो
१८ फेब्रुवारीभारत वि. नेदरलँडसंध्याकाळी 7:00मोदी स्टेडियम, अहमदाबाद
१९ फेब्रुवारीइटली वि. वेस्ट इंडीजसकाळी 11:00ईडन गार्डन्स, कोलकाता
१९ फेब्रुवारीश्रीलंका वि. झिम्बाब्वेदुपारी 3:00प्रेमदासा, कोलंबो
१९ फेब्रुवारीअफगाणिस्तान वि. कॅनडासंध्याकाळी 7:00चिदंबरम, चेन्नई
२० फेब्रुवारीऑस्ट्रेलिया वि. ओमानसंध्याकाळी 7:00पल्लेकेले, कॅन्डी

बाद फेरी (Knockouts)

  • 21 फेब्रुवारीपासून सुपर-8 चे सामने सुरु होतील.
  • पहिली उपांत्य फेरी: ४ मार्च (कोलंबो किंवा कोलकाता)
  • दुसरी उपांत्य फेरी: ५ मार्च (मुंबई) – जर भारत पात्र झाला तर हा सामना वानखेडेवर होईल.
  • महाअंतिम सामना: ८ मार्च (अहमदाबाद किंवा कोलंबो)
Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या