Ind vs Aus ODI Series Schedule: भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी युवा फलंदाज शुभमन गिल याला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आज (19 ऑक्टोबर) मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे.
या मालिकेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन. या दोन्ही खेळाडूंनी यापूर्वीच T20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
ही मालिका 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. भारताचा संघ या फॉरमॅटमध्ये आपली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल, अशी अपेक्षा आहे.
Ind vs Aus ODI Series: सामन्याचे वेळापत्रक आणि थेट प्रक्षेपण
या मालिकेतील तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार (IST) सकाळी 9:00 AM वाजता सुरू होतील.
- पहिला एकदिवसीय: 19 ऑक्टोबर (पर्थ)
- दुसरा एकदिवसीय: 23 ऑक्टोबर (ॲडलेड)
- तिसरा एकदिवसीय: 25 ऑक्टोबर (सिडनी)
या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण JioHotstar ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्सवर देखील हे सामने पाहता येतील. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या पुनरागमनामुळे प्रेक्षक संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
Ind vs Aus ODI Series: दोन्ही संघांचा पूर्ण स्क्वॉड
भारत संघ (India Squad): शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल, ध्रुव जुरेल, रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा.
ऑस्ट्रेलिया संघ (Australia Squad): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, कूपर कॉनोली, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, ॲलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल ओवेन, झेवियर बार्टलेट, बेन ड्वारशुईस, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा.
हे देखील वाचा – ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहित-विराट निवृत्त होणार का? BCCI उपाध्यक्ष म्हणाले…