Home / क्रीडा / जो रूट मोडणार सचिनचा मोठा विक्रम? मास्टर ब्लास्टर म्हणाला, ‘मी त्याला पहिल्यांदा पाहिल्यावरच…’

जो रूट मोडणार सचिनचा मोठा विक्रम? मास्टर ब्लास्टर म्हणाला, ‘मी त्याला पहिल्यांदा पाहिल्यावरच…’

Sachin Tendulkar on Joe Root:

Sachin Tendulkar on Joe Root: भारतीय क्रिकेटचा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने कसोटी क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आजही त्याचे काही विक्रम अबाधित आहेत, मात्र आता इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट (Joe Root) सचिनचा सर्वात मोठा विक्रम मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या विक्रमात जो रूट दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. यावर आता सचिनने प्रतिक्रिया दिली आहे.

जो रूट सचिनचा विक्रम मोडणार?

सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 15,921 धावा आहेत. तर, जो रूटने आत्तापर्यंत 13,543 धावा केल्या आहेत. तो सचिनच्या विक्रमापासून केवळ 2378 धावा दूर आहे. त्याच्या सध्याच्या फॉर्मनुसार जो रूट लवकरच हा विक्रम मोडू शकतो.

यावर एका चाहत्याने रेडिटवर (Reddit) विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सचिनने मोठे विधान केले. चाहत्याने विचारले होते की, जो रूटने 13,000 धावांचा टप्पा पार केला आहे आणि आता तो तुमच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?

या प्रश्नावर सचिनने उत्तर दिले, “13,000 धावांचा टप्पा पार करणे ही एक खूप मोठी कामगिरी आहे आणि तो अजूनही दमदार खेळत आहे. 2012 मध्ये नागपूरमध्ये त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात मी त्याला पहिल्यांदा पाहिले. तेव्हाच मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितले होते की, तुम्ही इंग्लंडच्या भविष्यातील कर्णधाराला पाहत आहात.

त्यावेळी मला त्याची विकेटची समज आणि स्ट्राइक रोटेट करण्याची क्षमता खूप प्रभावित करून गेली. त्याच क्षणी मला कळून चुकले की तो एक मोठा खेळाडू बनेल.”, असे सचिन म्हणाला.

भारताविरुद्ध शानदार कामगिरी

जो रूटने नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेतही उत्कृष्ट कामगिरी केली. या मालिकेत त्याने 537 धावा काढल्या, ज्यात तीन शतकांचा समावेश होता. त्याचे पुढील मोठे आव्हान या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या ॲशेस मालिकेत असेल. ॲशेसमध्ये त्याने अद्याप ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावलेले नाही.


हे देखील वाचा-

अथर्व सुदामेच्या रीलमुळे वाद; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या व्हिडिओवरून सोशल मीडियावर टीका

“दबाव कितीही आला तरी…”, अमेरिकेच्या आयात शुल्कावर पीएम मोदींचा थेट इशारा

मंत्री शिरसाट यांच्या विरोधात पुरावे रोहित पवारांनी राजीनामा मागितला