Home / क्रीडा / Sameer Rizvi Record: सलग 3 सामन्यांत ‘मॅन ऑफ द मॅच’! समीर रिझवीचा खास विक्रम; मिळवले विराट कोहलीच्या पंक्तीत स्थान

Sameer Rizvi Record: सलग 3 सामन्यांत ‘मॅन ऑफ द मॅच’! समीर रिझवीचा खास विक्रम; मिळवले विराट कोहलीच्या पंक्तीत स्थान

Sameer Rizvi consecutive POTM awards IPL : आयपीएल 2026 मध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर ‘समीर रिझवी’ नावाच्या वादळाने मुंबई इंडियन्सच्या...

By: Team Navakal
Sameer Rizvi consecutive POTM awards IPL
Social + WhatsApp CTA

Sameer Rizvi consecutive POTM awards IPL : आयपीएल 2026 मध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर ‘समीर रिझवी’ नावाच्या वादळाने मुंबई इंडियन्सच्या गोलदाजांविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली. दिल्ली कॅपिटल्सच्या या 22 वर्षीय युवा फलंदाजाने अवघ्या 51 चेंडूत 90 धावांची खेळी करत आपल्या संघाला 7 गडी राखून मोठा विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले असून, त्याने आयपीएलच्या इतिहासात एका दुर्मिळ विक्रमाची नोंद केली आहे.

विराट, सेहवागच्या पंक्तीत स्थान

मेरठच्या या अनकॅप्ड खेळाडूने आयपीएलमध्ये सलग तिसऱ्या सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकला आहे. असा पराक्रम करणारा तो आयपीएलमधील केवळ 8 वा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी जॅक कॅलिस (2010), वीरेंद्र सेहवाग (2012), ग्लेन मॅक्सवेल (2014), अ‍ॅरॉन फिंच (2016), विराट कोहली (2016), जोस बटलर (2018) आणि ऋतुराज गायकवाड (2020) यांनीच अशी कामगिरी केली होती.

सलग तीन अर्धशतकांचा धमाका

समीर रिझवीने केवळ पुरस्कारच नाही, तर धावांचाही पाऊस पाडला आहे. त्याने आयपीएलमध्ये सलग 3 डावात 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अनकॅप्ड खेळाडू म्हणून असा पराक्रम करणारा तो ऋतुराज गायकवाड आणि प्रभसिमरन सिंग यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने 2025 च्या शेवटच्या सामन्यात पंजाबविरुद्ध नाबाद 58, तर 2026 च्या पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे नाबाद 70 आणि 90 धावा केल्या आहेत.

इम्पॅक्ट प्लेयर म्हणून ऐतिहासिक खेळी

मुंबईविरुद्धच्या सामन्यात समीरने केलेली 90 धावांची खेळी ही आयपीएल इतिहासातील ‘इम्पॅक्ट प्लेयर’ने केलेली तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. दिल्लीने मुंबईचे 163 धावांचे लक्ष्य केवळ 18.1 ओव्हर्समध्येच पूर्ण केले. समीरच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सची बाजू यंदाच्या हंगामात अधिक भक्कम होताना दिसत आहे.

हे देखील वाचा –

USA Iran War: तेहरानवर अमेरिकेचा भीषण हल्ला! इराणचे बडे लष्करी अधिकारी मारल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

Who is Ashok Sharma: वेगाचा नवा राजा! कोण आहे अशोक शर्मा? ताशी 154 किमी वेगाने चेंडू टाकून फलंदाजांना केलं हतबल

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या