ज्याने हा ग्रंथ वाचला त्याचा मृत्यू अटळ

निळावंती ग्रंथ ज्याने वाचला त्या व्यक्तीचा ६ महिन्यात मृत्यू तरी होतो किंवा ती व्यक्ती पूर्ण वेडी तरी होते असे म्हटले जाते. हा ग्रंथ वाचून त्यातील विद्या आत्मसात करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्या सगळ्यांच्या पदरी मृत्यूच पडला. काळी जादू,तंत्र विद्या शिकवणाऱ्या या ग्रंथाच्या नादी शहाण्या माणसाने लागू नये असाच सल्ला दिला जातो.

निळावंती वाचल्यावर पशू-पक्ष्यांची भाषा समजायला लागते…हे पशू-पक्षी मग गुप्तधनाची माहिती देतात शिवाय या गुप्तधनापर्यंत पोहोचायचे कसे याचा मार्गदेखील या ग्रंथात सांगितल्याचे बोलले जाते.निळावंती वाचायला सुरुवात केली की आसपासचे वातावरण बदलते…वारा वाहू लागतो… डोके दुखू लागते…डोळ्यातून पाणी येऊ लागते…मरणवेदना होऊ लागतात. निळावंती ग्रंथ वाचण्यापासून थांबवण्यासाठी अनेक अघोरी शक्तींचे अस्तित्व ग्रंथ वाचणाऱ्यांना जाणवू लागते. पण या विचित्र शक्तींना न घाबरता ग्रंथ पुढे वाचत गेला तर निळावंती दर्शन देते आणि ती एकेका प्राण्याशी बोलत जाते आणि त्या प्राण्यांची भाषा ग्रंथ वाचणाऱ्याला समजू लागते. हा ग्रंथ जो कोणी वाचून पूर्ण करेल त्याला पशू-पक्ष्यांसह ८४ लक्ष योनींची भाषा आत्मसात होते. अगदी भूत, प्रेत, पिशाच्च यांच्या भाषा देखील समजू लागतात असेही सांगितले जाते.

अमावस्येच्या रात्री गरोदर बाईच्या चितेच्या प्रकाशात हा ग्रंथ वाचला तरच ग्रंथातील गूढविद्या आत्मसात करता येते असे सांगितले जाते. मात्र या ग्रंथावर भारतात १९३५ सालापासून बंदी घालण्यात आली आहे. तत्कालीन ब्रिटिश सरकारकडून ही बंदी घालण्यात आली होती. निळावंतीवर बंदी नेमकी का आणली याचे ठोस कारण नसले तरी असे सांगण्यात येते की या ग्रंथाचा वापर काळ्या जादूसाठी करण्यात येत असल्यानेच ब्रिटिशांकडून ही बंदी आणण्यात आली.

Scroll to Top