Home / लेख / Electric Cars Launch: भारतीय बाजारपेठेत येणार 5 जबरदस्त इलेक्ट्रिक कार! टाटा, टोयोटा आणि कियाच्या गाड्यांचा समावेश; पाहा यादी

Electric Cars Launch: भारतीय बाजारपेठेत येणार 5 जबरदस्त इलेक्ट्रिक कार! टाटा, टोयोटा आणि कियाच्या गाड्यांचा समावेश; पाहा यादी

Electric Vehicle Launch : भारतात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची लाट आली असून अनेक दिग्गज वाहन उत्पादक कंपन्या आपली नवीन मॉडेल्स लाँच...

By: Team Navakal
Electric Cars Launch
Social + WhatsApp CTA

Electric Vehicle Launch : भारतात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची लाट आली असून अनेक दिग्गज वाहन उत्पादक कंपन्या आपली नवीन मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये जुन्या लोकप्रिय ब्रँड्सच्या पुनरागमनापासून ते नवीन कंपन्यांच्या एन्ट्रीपर्यंत अनेक पर्यायांचा समावेश आहे. लवकरच भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या 5 महत्त्वाच्या इलेक्ट्रिक कारची माहिती खालीलप्रमाणे आहे.

1. टाटा सिएरा ईव्ही (Tata Sierra EV)

टाटा मोटर्स आपल्या लोकप्रिय ‘सिएरा’ ब्रँडला आता इलेक्ट्रिक अवतारात परत आणत आहे. ही मिड-साईज एसयूव्ही असून यामध्ये 4×4 ड्रायव्हिंग सिस्टिम मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये 55kWh आणि 65kWh क्षमतेचे बॅटरी पॅक दिले जाऊ शकतात, जे कर्व्ह ईव्ही आणि हॅरियर ईव्हीच्या दरम्यान असतील.

2. टाटा सफारी ईव्ही (Tata Safari EV)

टाटाच्या इलेक्ट्रिक ताफ्यातील दुसरी महत्त्वाची गाडी म्हणजे सफारी ईव्ही. ही थ्री-रो म्हणजेच 7 सीटर एसयूव्ही असेल. महिंद्राच्या आगामी इलेक्ट्रिक गाड्यांना टक्कर देण्यासाठी टाटा ही गाडी हॅरियर ईव्हीच्या वरच्या श्रेणीत लाँच करणार आहे.

3. टोयोटा एबेला (Toyota Ebella)

टोयोटा अर्बन क्रूझर एबेला ही कंपनीची भारतातील पहिली बॅटरी इलेक्ट्रिक कार असेल. ही गाडी मारुती सुझुकीच्या ई-विटारावर आधारित असली, तरी तिचा लूक टोयोटाच्या स्टाईलमध्ये असेल. यामध्ये 49kWh आणि 61kWh असे दोन बॅटरी पर्याय मिळतील, जे एका चार्जवर 543 किमी पर्यंतची रेंज देतील. या महिन्याच्या अखेरपर्यंत या गाडीची किंमत जाहीर होऊ शकते.

4. किया सायरस ईव्ही (Kia Syros EV)

किया इंडिया जुलै 2026 मध्ये आपली सायरस ईव्ही प्रदर्शित करणार आहे. ही गाडी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ह्युंदाई इन्स्टर ईव्हीच्या तंत्रज्ञानावर आधारित असेल. यामध्ये 42kWh आणि 49kWh क्षमतेचे बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे. या गाडीचा डिझाइन आणि फीचर्स सध्याच्या पेट्रोल मॉडेलपेक्षा वेगळे असतील.

5. विनफास्ट व्हीएफ 3 (Vinfast VF 3)

वियतनामची कंपनी विनफास्ट भारतीय बाजारपेठेत 10 लाख रुपयांच्या आतील सेगमेंटमध्ये ‘व्हीएफ 3’ ही छोटी इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. ही गाडी एमजी कॉमेट ईव्हीला थेट टक्कर देईल. यामध्ये 18.64kWh ची बॅटरी असून ती 215 किमीची रेंज देईल. महत्त्वाचे म्हणजे, ही गाडी अवघ्या 36 मिनिटांत 10 ते 70 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.

हे देखील वाचा – West Bengal CM Race: बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय! आता मुख्यमंत्री कोण? ‘या’ नावांची जोरदार चर्चा

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या