Home / लेख / Hyundai च्या कार खरेदीवर मोठी बचत! मिळतेय 1,00,000 रुपयांपर्यंतची सूट;पाहा डिटेल्स

Hyundai च्या कार खरेदीवर मोठी बचत! मिळतेय 1,00,000 रुपयांपर्यंतची सूट;पाहा डिटेल्स

Hyundai Car Discounts

Hyundai Car Discounts: भारतीय बाजारात ह्युंडाईच्या गाड्यांना त्यांच्या उत्कृष्ट फीचर्स आणि आकर्षक डिझाइनमुळे मोठी पसंती मिळते. जर तुम्हीही कमी बजेटमध्ये ह्युंदाईची नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.

कंपनी आपल्या विविध गाड्यांवर 1,00,000 रुपयांपर्यंतची मोठी सूट देत आहे. या ऑफर्समध्ये रोख सूट, एक्सचेंज बोनस आणि इतर फायदे समाविष्ट आहेत. त्यामुळे ग्राहकांना चांगली बचत करण्याची संधी आहे.

ह्युंडाई आपल्या लोकप्रिय मॉडेल्सवर मोठी सूट देत आहे. यात सर्वाधिक 1,00,000 रुपयांपर्यंतची सूट Hyundai Tucson या प्रीमियम एसयूव्हीवर मिळत आहे. यानंतर, कॉम्पॅक्ट एसयूव्ही Hyundai Venue वर 85,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. कंपनीच्या 7-सीटर मॉडेल Hyundai Alcazar वर 70,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

तसेच, Hyundai Grand i10 NIOS आणि सेडान मॉडेल Hyundai Verna या दोन्ही गाड्यांवर 65,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. ह्युंदाईच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्हीपैकी एक असलेल्या Hyundai Creta वर 5,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात.

या व्यतिरिक्त, Hyundai Exter वर 60,000 रुपये, Hyundai Aura वर 55,000 रुपये, आणि Hyundai i20 वर 65,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. या ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या ह्युंदाई डीलरशिपशी संपर्क साधू शकता. लक्षात घ्या की, डीलरशीप व शहरानुसार गाडीवरील ऑफरमध्ये बदल असू शकतो.


ताज्या  बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

ChatGPT vs Perplexity vs Gemini vs Grok: कोणते AI मॉडेल तुमच्यासाठी बेस्ट? किती आहे सबस्क्रिप्शन शुल्क? वाचा

‘Trump is dead’ ट्रेंडमुळे सोशल मीडियावर खळबळ, ट्रम्प यांच्या मृत्यूची अफवा कशी पसरली? जाणून घ्या

नागपूरमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीची हत्या