Redmi Turbo 5 Sale: शाओमी कंपनीच्या बहुप्रतीक्षित टर्बो सीरिजमधील पहिला स्मार्टफोन Redmi Turbo 5ची विक्री देशभरात अधिकृतपणे सुरू झाली आहे. दमदार परफॉर्मन्स आणि अवाढव्य बॅटरी बॅकअपसाठी ओळ्खला जाणारा हा फोन आता ग्राहकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.
हा फोन ग्राहकांसाठी अॅमेझॉन, कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. आकर्षक ऑफर्स आणि 3 वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहक हा हँडसेट खरेदी करू शकतात.
Redmi Turbo 5 : किंमत आणि डिस्काउंट ऑफर्स
हा स्मार्टफोन 2 वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे:
- 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज: या व्हेरियंटची किंमत 37,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
- 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज: या टॉप व्हेरियंटची किंमत 40,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
- बँक ऑफर: विक्रीच्या सुरुवातीला एसबीआय, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकेच्या कार्डवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2,000 रुपयांची त्वरित सूट दिली जात आहे.
Redmi Turbo 5 : 7,540mAh ची अवाढव्य बॅटरी आणि जबरदस्त डिस्प्ले
हा फोन मुख्यत्वे त्याच्या पॉवरफुल बॅटरी बॅकअपमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे:
- चार्जिंग आणि बॅटरी: फोनमध्ये तब्बल 7,540mAh क्षमतेची प्रचंड मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे, तसेच 27W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगची सुविधाही यात मिळते.
- डिस्प्ले: 6.59 इंचाचा 1.5K अमोलेड डिस्प्ले असून तो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,500 नीट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास 7i चा वापर करण्यात आला आहे.
- पाणी आणि धुळीपासून संरक्षण: हा फोन पाण्याच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत कडक मानल्या जाणाऱ्या IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंग्जसह सुरक्षित करण्यात आला आहे.
सॉफ्टवेअर, प्रोसेसर आणि 50MP चा तगडा कॅमेरा
मोबाईलमध्ये वेगवान कामगिरीसाठी मीडियाटेक डायमेंसिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसर बसवण्यात आला आहे, जो 12GB पर्यंतच्या अल्ट्रा रॅमसोबत उत्तम काम करतो. गेमिंग दरम्यान फोन गरम होऊ नये म्हणून यात विशेष कूलिंग सिस्टम आणि गेम टर्बो वाईल्ड बूस्ट तंत्रज्ञान दिले आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित हायपरओएस 3 वर चालतो, ज्याला 4 वर्षे ओएस अपडेट आणि 6 वर्षे सिक्युरिटी अपडेट मिळतील.
फोटोग्राफीसाठी फोनच्या पाठीमागे ओआयएस सपोर्ट असलेला 50 मेगापिक्सेलचा सोनी IMX882 मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यातून 60fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते. सेल्फीसाठी समोर 20 मेगापिक्सेलचा FRONT कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय यात गुगल जेमिनी आणि सर्कल टू सर्च सारखे आधुनिक एआय फीचर्स देखील इन-बिल्ट मिळतात.










