Tata Tiago Details: टाटा मोटर्सची लोकप्रिय हॅचबॅक कार Tata Tiago खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल, तर तुमच्यासाठी एक सोपा फायनान्स प्लॅन उपलब्ध आहे. जर तुम्ही फक्त 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून ही कार घरी आणू इच्छित असाल, तर उर्वरित कर्जाची रक्कम आणि त्यावर आकारला जाणारा मासिक हप्ता किती असेल, याची संपूर्ण माहिती येथे दिली आहे.
Tata Tiago ची ऑन-रोड किंमत:
- टाटा मोटर्सकडून टियागोचा बेस व्हेरियंट 4.57 लाख रुपये एक्स-शोरूम किमतीत ऑफर केला जातो.
- दिल्लीमध्ये या कारची ऑन-रोड किंमत सुमारे 5.05 लाख रुपये होते.
- या किमतीत एक्स-शोरूम किंमत, सुमारे 18,000 रुपये RTO आणि सुमारे 29,000 रुपये इन्शुरन्सचा खर्च समाविष्ट असतो.
1 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यास EMI किती?
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरियंट खरेदी केल्यास बँक एक्स-शोरूम किमतीवर कर्ज देईल.
- कर्जाची रक्कम: 1 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 4.05 लाख रुपये बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल.
- मासिक EMI: जर बँकेने 9 टक्के व्याजासह 7 वर्षांसाठी 4.05 लाख रुपये कर्ज दिले, तर तुम्हाला पुढील 7 वर्षांसाठी दरमहा केवळ 6,522 रुपये EMI भरावा लागेल.
कारची एकूण किंमत:
9 टक्के व्याज दराने 7 वर्षांसाठी कार लोन घेतल्यास, तुम्हाला या कालावधीत सुमारे 1.42 लाख रुपये फक्त व्याज म्हणून भरावे लागतील. अशाप्रकारे, एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजाचा खर्च मिळून तुम्हाला कारची एकूण किंमत सुमारे 6.47 लाख रुपये पडेल.
या कारशी होते स्पर्धा:
टाटा टियागो हॅचबॅक सेगमेंटमध्ये येते. भारतीय बाजारपेठेत या कारची स्पर्धा Maruti Alto K10, Celerio, S Presso, Wagon R, Hyundai Grand Nios i10 यांसारख्या हॅचबॅक कारशी होते.
हे देखील वाचा – Nothing चा नवीन स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच, किंमत कमी; फीचर्स जबरदस्त









