Home / मनोरंजन / Deool band 2 : आयपीएलचा ‘फायनल’ फिव्हरही पडला फिका! अख्ख्या महाराष्ट्रात ‘देऊळ बंद २’ची हवा; हाऊसफुल्ल बोर्ड्ससह बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई…

Deool band 2 : आयपीएलचा ‘फायनल’ फिव्हरही पडला फिका! अख्ख्या महाराष्ट्रात ‘देऊळ बंद २’ची हवा; हाऊसफुल्ल बोर्ड्ससह बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई…

Deool band 2 : प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनातून साकार झालेल्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून...

By: Team Navakal
Deool Band 2
Social + WhatsApp CTA

Deool band 2 : प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनातून साकार झालेल्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून अभूतपूर्व आणि भरभरून प्रतिसाद लाभत आहे. साप्ताहिक सुट्टीच्या (वीकेंड) निमित्ताने राज्यभरातील स्वामीभक्तांनी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, रविवारी ‘इंडियन प्रीमियर लीग’चा (आयपीएल) अत्यंत चुरशीचा अंतिम सामना असूनही, या चित्रपटाच्या प्रक्षेपणावर त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. क्रिकेटच्या या महासंग्रामाच्या दिवशीही ‘देऊळ बंद २’ चे सर्व शोज संपूर्ण क्षमतेने म्हणजेच ‘हाऊसफुल्ल’ चालले. या घवघवीत यशाबद्दल स्वतः दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी प्रेक्षकांचे जाहीर आभार मानत आनंद व्यक्त केला आहे.

कोणत्याही मोठ्या पाठबळाशिवाय चित्रपट यशस्वी
या यशाचे वेगळेपण सांगताना प्रवीण तरडे म्हणाले की, सामान्यतः आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या काळात मोठे निर्माते आपले चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस करत नाहीत. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही आम्ही चित्रपट प्रदर्शित केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याला ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, या चित्रपटाच्या पाठीशी कोणतीही मोठी वाहिनी (सॅटेलाईट चॅनेल) अथवा नामांकित कॉर्पोरेट कंपनीचे आर्थिक पाठबळ नव्हते. एका सर्वसामान्य निर्मात्याने या चित्रपटाच्या वितरणाची आणि प्रदर्शनाची धुरा सांभाळली असून, प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतले आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री आणि प्रवीण तरडे यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांनीही प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. केवळ दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत चित्रपट ५० कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा ओलांडत असून, ही केवळ स्वामी समर्थांचीच कृपा असल्याची भावना तरडे यांनी यावेळी बोलून दाखवली.

कमाईचे नवे विक्रम आणि सामाजिक विषय
व्यावसायिक गणितांचा विचार केला तर, ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या ११ दिवसांत तब्बल ५०.१५ कोटी रुपयांचा गल्ला जमवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अभिनेता रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटानंतर मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देणारा हा दुसरा मोठा चित्रपट ठरला आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या जागतिक यादीत या चित्रपटाने आता सहावे स्थान पटकावले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या