Latur Rain – लातूर जिल्ह्यातील मातोळा, लोटा आणि कवळी परिसरात पहाटे साडेतीन तास ढगफुटीसदृश (cloudburst)पाऊस झाला. मराठवाड्यातील बीड (Beed), लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती (flood) निर्माण झाली.
रेणा सहकारी साखर कारखान्याच्या (Rena Cooperative Sugar Factory)कार्यक्षेत्रात सहा ते सात हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस जमिनीवर आडवा पडला आहे. शासनाने पंचनामे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी,अशी मागणी माजी चेअरमन यशवंतराव पाटील यांनी केली आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले असून संपूर्ण वाड्या–वस्त्यांना पुराचे स्वरूप आले. संपूर्ण गावांना तळ्याचे रूप आले होते. या भागामध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार ठप्प झाली.
बीड-खरवंडी महामार्गाचे (Beed-Kharwandi highway) काम रखडल्याने पर्यायी मार्गही पाण्याखाली गेला आहे. बीडच्या पाथर्डी (Pathardi)तालुक्यातील शेरापूर गावात दोन तासांच्या मुसळधार पावसामुळे शेतजमीन वाहून गेली आणि एक तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. बीडमधील तब्बल ४ लाख २० हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यात १६ लाख २१ एकरांवरची पिके उद्धवस्त झाली आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यात जोरदार पावसामुळे येरळा नदीला पूर आला.
हे देखील वाचा –
विश्व हिंदू परिषदेचा इशारा; गरब्यात मुस्लीम व्यक्ती नको
नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग? पाहा संपूर्ण यादी
महाराष्ट्रात पहिल्यांदाच फॉर्म्युला नाईट स्ट्रीट रेस, जाणून घ्या कुठे होणार आणि कधी?