Home / महाराष्ट्र / सातारच्या काळभैरव मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड लागू

सातारच्या काळभैरव मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड लागू

सातारा – राज्यातील काही प्रमुख मंदिरांनंतर सातारा तालुक्यातील वर्णे-आबापुरी येथील स्वयंभू श्री काळभैरवनाथ मंदिरातही (kal bhairavnath Temple) भाविकांसाठी ड्रेसकोड (new...

By: Team Navakal
kal bhairavnath Temple new dress code

सातारा – राज्यातील काही प्रमुख मंदिरांनंतर सातारा तालुक्यातील वर्णे-आबापुरी येथील स्वयंभू श्री काळभैरवनाथ मंदिरातही (kal bhairavnath Temple) भाविकांसाठी ड्रेसकोड (new dress code)म्हणजेच वस्त्र संहिता लागु केली आहे.आता भाविकांना मंदिरात प्रवेश करताना तोकडे कपडे परिधान करण्यास बंदी घातली आहे.

गेल्या रविवारपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.मंदिरातील पावित्र्य राखण्यासाठी तसेच आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला असून मंदिरात तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.या मंदिरात काही भाविकांसह पर्यटकही येत असतात. हे पर्यटक याठिकाणी येताना बर्मुडा, शॉर्ट, स्कर्ट या स्वरूपाचे पाश्चिमात्य धर्तीचे कपडे परिधान करून येतात. त्यामुळे मंदिराच्या पावित्र्याला धक्का पोहोचतो.त्यामुळे यापुढे पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या भाविकांनाच मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल,असे श्री काळभैरव देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले आहे. या वस्त्रसंहितेची सूचना देणारे फलक मंदिराच्या दोन्ही बाजूच्या प्रवेशद्वारांवर भाविकांच्या माहितीसाठी लावले आहेत.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या