Home / महाराष्ट्र / Omraje Nimbalkar : कोर्टाच्या दारात पोहोचताच ओमराजे निंबाळकर भावूक?आयुष्यात खूप मोठ्या यातना भोगल्या, भयंकर संघर्ष केला’ म्हणत दिली पहिली प्रतिक्रिया!

Omraje Nimbalkar : कोर्टाच्या दारात पोहोचताच ओमराजे निंबाळकर भावूक?आयुष्यात खूप मोठ्या यातना भोगल्या, भयंकर संघर्ष केला’ म्हणत दिली पहिली प्रतिक्रिया!

Omraje Nimbalkar : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाला हादरवून टाकणाऱ्या माजी आमदार पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा अंतिम निकाल तब्बल २०...

By: Team Navakal
Omraje Nimbalkar
Social + WhatsApp CTA

Omraje Nimbalkar : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाला हादरवून टाकणाऱ्या माजी आमदार पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा अंतिम निकाल तब्बल २० वर्षांनंतर आज न्यायालय सुनावणार आहे. या अत्यंत संवेदनशील खटल्याच्या पार्श्वभूमीवर, पवनराजे यांचे सुपुत्र खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांचे कुटुंबीय न्यायालय परिसरात दाखल झाले आहेत. तसेच, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी माजी मंत्री पद्मसिंह पाटील हेदेखील थेट रुग्णवाहिकेने (ॲम्ब्युलन्स) न्यायालयात पोहोचले असून, त्यांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी डॉक्टरांचे एक मोठे पथक त्यांच्यासोबत हजर आहे. न्यायालयाने या खटल्यातील सर्व ९ आरोपींना न्यायालयात उपस्थित राहण्याचे कडक आदेश दिले होते, त्यानुसार सध्या जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींपैकी ७ आरोपी न्यायालयासमोर हजर झाले आहेत. यामध्ये बिहार पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पिंटू सिंह या आरोपीलाही कडेकोट बंदोबस्तात आणण्यात आले आहे.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
३ जून २००६ रोजी पवनराजे निंबाळकर हे मुंबईहून धाराशिवच्या दिशेने निघाले असताना, कळंबोली जवळ त्यांच्या गाडीवर दबा धरून बसलेल्या हल्खोरांनी बेछूट गोळीबार केला होता. या भीषण आणि पूर्वनियोजित हल्ल्यामध्ये पवनराजे निंबाळकर यांच्यासह त्यांच्या चालकाचाही जागीच मृत्यू झाला होता. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली होती. राजकीय वैमनस्यातून ही सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास दीर्घकाळ सुरू होता आणि सर्व संशयित आरोपींना कालांतराने अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांना अटकेनंतर अवघ्या साडेतीन महिन्यांत जामीन मंजूर झाला होता, तर उर्वरित आरोपीही सध्या जामिनावर मुक्त आहेत.

“या २० वर्षांत अनेक यातना भोगल्या” – ओमराजे निंबाळकर यांची भावूक प्रतिक्रिया:
न्यायालयात दाखल झाल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत भावूक आणि संतप्त भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “आजचा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा आहे. गेल्या २० वर्षांच्या प्रदीर्घ काळामध्ये आम्ही असह्य मानसिक यातना आणि प्रचंड संघर्ष सहन केला आहे. राजकीय आणि कौटुंबिक अशा दोन्ही स्तरांवर आमच्या कुटुंबाने मोठा आघात झेलला आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज न्यायालयाने निकालाची तारीख निश्चित केली असून, आम्हाला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे आणि आज आम्हाला निश्चितच न्याय मिळेल.”

राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निकाल:
हा न्यायालयीन निकाल अशा वेळी येत आहे, जेव्हा ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच एक मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. बंडखोरी केलेले इतर पाच खासदार सध्या सुरक्षित स्थळी असताना, ओमराजे निंबाळकर यांनी मात्र स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहत हा निर्णय घेतला.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या