Home / महाराष्ट्र / बच्चू कडूंच्या अपात्रतेवर २४ जूनला अंतिम निर्णय

बच्चू कडूंच्या अपात्रतेवर २४ जूनला अंतिम निर्णय

अमरावती– अमरावती (Amravti)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या अपात्रतेच्या (disqualification case) प्रकरणात प्रहार संघटनेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu...

By: Team Navakal
bachchu Kadu in Amravati
Social + WhatsApp CTA

अमरावती– अमरावती (Amravti)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या अपात्रतेच्या (disqualification case) प्रकरणात प्रहार संघटनेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu)यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज नकार दिला. अध्यक्षपदासाठी अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास न्यायलयाने नकार दिला.
या प्रकरणात विरोधक आणि सहकार विभाग यांना आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली असून, अंतिम निर्णय २४ जून रोजी देण्यात येणार आहे.
नाशिकच्या विशेष न्यायालयाने बच्चू कडूंना एका गुन्ह्यात एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सहकार विभागाने त्यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी अपात्र ठरवले होते. या निर्णयाला बच्चू कडूंनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांच्या वकिलांनी शिक्षेवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने अपात्रता लागू होत नाही, असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायमूर्ती पानसरे यांच्या खंडपीठाने अद्याप अंतिम निर्णय दिला नाही. या प्रकरणात विरोधकांनी न्यायालयात कॅवेट दाखल केली होती. त्यामुळे न्यायालयाने त्यांना आणि सहकार विभागाला आपली भूमिका सादर करण्यासाठी संधी दिली आहे. २४ जून रोजी न्यायालय या सर्व बाजूंनी ऐकून घेतल्यानंतर निर्णय देणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या