Home / महाराष्ट्र / Mumbai News : मुंबईकरांनो जपून चाला! उघडे मॅनहोल बनले यमदूत -मॅनहोलमध्ये माणूस वाहून गेल्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू, ‘स्मार्ट सिटी’च्या नावाने पालिका प्रशासनाचा पुन्हा एकदा बोजवारा!

Mumbai News : मुंबईकरांनो जपून चाला! उघडे मॅनहोल बनले यमदूत -मॅनहोलमध्ये माणूस वाहून गेल्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू, ‘स्मार्ट सिटी’च्या नावाने पालिका प्रशासनाचा पुन्हा एकदा बोजवारा!

Mumbai News : राज्यभरात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून, मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांची मालिका थांबताना दिसत नाहीये. दोनच...

By: Team Navakal
Sakinaka Manhole
Social + WhatsApp CTA

Mumbai News : राज्यभरात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून, मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांची मालिका थांबताना दिसत नाहीये. दोनच दिवसांपूर्वी चेंबूर येथे एका शाळेच्या बसवर झाड कोसळून एका निष्पाप विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना ताजी असतानाच, आता मुंबईत आणखी एक थरारक आणि चिंताजनक दुर्घटना समोर आली आहे. मुंबईतील साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर एका उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडली असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

मोबाईलवर बोलत असताना घडली दुर्घटना; छत्री आणि चप्पल सापडली
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, साकीनाका येथील खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ हा अपघात घडला. या मॅनहोलच्या देखभालीचे काम एका खासगी कंत्राटदाराकडून सुरू होते, ज्याच्या निष्काळजीपणामुळे मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहिमेदरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री आणि चप्पल मॅनहोलजवळ जप्त करण्यात आली आहे. मात्र, पावसाच्या पाण्याचा प्रवाहाचा वेग अत्यंत तीव्र असल्याने ही व्यक्ती भुयारी गटारात वाहून गेल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

रेस्क्यू ऑपरेशन सुरू-
सध्या मुंबई अग्निशामक दल (MFB), स्थानिक पोलीस प्रशासन, प्रभाग कार्यालयाचे कर्मचारी आणि ‘१०८’ रुग्णवाहिका दल घटनास्थळी तैनात असून संयुक्तपणे शोधमोहीम राबवत आहेत. पाण्याचा प्रवाह आणि भुयारी मार्गाचे जाळे लक्षात घेऊन विविध ठिकाणी तपास केला जात आहे.

महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
मुंबईत पावसाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच गेल्या आठवड्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) एक अधिकारीच स्वतः मॅनहोलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतरही प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या
Sakinaka Manhole

Sakinaka Manhole : मुंबईतील साकीनाका मॅनहोल दुर्घटना: शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू; पालिकेच्या कारभारावर तीव्र संताप-अजून किती निष्पाप बळी घेणार? संजय घाडींचा अश्विनी भिडेंवर थेट रोख..