Home / महाराष्ट्र / Mumbai-Bengaluru Train: मुंबई-बेंगळुरू प्रवास होणार सुसाट! जूनमध्ये सुरू होणार नवीन सुपरफास्ट ट्रेन

Mumbai-Bengaluru Train: मुंबई-बेंगळुरू प्रवास होणार सुसाट! जूनमध्ये सुरू होणार नवीन सुपरफास्ट ट्रेन

Mumbai-Bengaluru Train: मुंबई, पुणे आणि बेंगळुरू या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी केंद्र सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. या...

By: Team Navakal
Mumbai-Bengaluru Train
Social + WhatsApp CTA

Mumbai-Bengaluru Train: मुंबई, पुणे आणि बेंगळुरू या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी केंद्र सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. या व्यस्त मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, भारतीय रेल्वे लवकरच एक नवीन सुपरफास्ट ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून 2026 च्या अखेरीस ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

Mumbai-Bengaluru Train: पुणे-सातारा मार्गे धावणार गाडी

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर या नवीन रेल्वे सेवेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ही गाडी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून सुटेल आणि ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, लोणंद, सातारा, कराड, सांगली, मिरज, बेळगावी, धारवाड, हुबळी आणि दावणगेरे या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबत बेंगळुरूला पोहोचेल. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा एक मोठा रेल्वे कॉरिडॉर प्रवाशांसाठी उपलब्ध होईल.

Mumbai-Bengaluru Train: वंदे भारत स्लीपरचे संकेत

सध्या ही गाडी आठवड्यातून 2 दिवस धावणारी सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून सुरू केली जाईल. मात्र, भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरण मोहिमेअंतर्गत भविष्यात या मार्गावर ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन सुरू करण्याचाही विचार सुरू आहे. वंदे भारत स्लीपरमुळे रात्रीचा प्रवास अधिक सुखकर होईल आणि मुंबई ते बेंगळुरू हे अंतर कमी वेळेत पार करता येईल.

Mumbai-Bengaluru Train: 14 तासांत पूर्ण होणार प्रवास?

काही प्राथमिक रिपोर्ट्सनुसार, ही सुपरफास्ट ट्रेन मुंबई ते बेंगळुरू हे अंतर साधारणपणे 14 तासांत पूर्ण करू शकते. या ट्रेनमध्ये आधुनिक एलएचबी (LHB) कोचेस, बायो-टॉयलेट्स आणि आरामदायी आसनव्यवस्था यांसारख्या सुविधा असतील. नियमित सेवा सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात या गाडीची ‘इनॉग्रल स्पेशल रन’ म्हणजेच पहिली चाचणी फेरी घेतली जाण्याची शक्यता आहे.

प्रवाशांना मिळणार दिलासा

सध्या मुंबई-बेंगळुरू प्रवासासाठी रस्ते मार्ग किंवा विमानाचा खर्चिक पर्याय निवडावा लागतो. नवीन रेल्वे सुरू झाल्यामुळे व्यापारी, विद्यार्थी आणि पर्यटकांची मोठी सोय होईल. भारतीय रेल्वेकडून लवकरच या गाडीचे अधिकृत वेळापत्रक आणि तिकीट दरांची घोषणा केली जाईल.

हे देखील वाचा – PM Modi Appeal: इंधनाची बचत करा आणि वर्षभर सोनं खरेदी टाळा! पंतप्रधान मोदींचे देशाला मोठे आवाहन; पाहा नक्की असे का म्हणाले?

Web Title:
संबंधित बातम्या