Home / महाराष्ट्र / काळाचौकीतील टेक्सटाईल म्युझियमचे लवकरच लोकार्पण

काळाचौकीतील टेक्सटाईल म्युझियमचे लवकरच लोकार्पण

मुंबई – काळाचौकी (Kalachowkie)येथील महत्वाकांक्षी टेक्स्टाईल म्युझियमच्या (Textile Museum) पहिल्या टप्प्याचे पूर्ण होत आले असून लवकरच हे म्युझियम जनतेसाठी खुले...

By: Team Navakal
Textile Museum At Kalachowkie


मुंबई – काळाचौकी (Kalachowkie)येथील महत्वाकांक्षी टेक्स्टाईल म्युझियमच्या (Textile Museum) पहिल्या टप्प्याचे पूर्ण होत आले असून लवकरच हे म्युझियम जनतेसाठी खुले केले जाणार आहे.या म्युझियमच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे.
काळाचौकीतील इंडिया युनायटेड मील २ आणि ३ च्या ४४ हजार चौरस मीटर ( 44,000-sq.)क्षेत्रफळावर हे टेक्स्टाईल म्युझियम आणि मनोरंजन उद्यान उभारण्यात येत आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ७ हजार मीटरवरील (7,000-sq)काम सन २०१९ मध्ये सुरू करण्यात आले होते. आता सहा वर्षांनंतर हे काम जवळपास पूर्ण होत आले आहे.या कामामध्ये अनेक अडथळे आल्याने कामाला विलंब झाला आहे.या पहिल्या टप्प्यात वस्त्रोद्योगावर आधारित भित्तीचित्रे,एम्फिथिएटर आणि थ्री डायमेन्शनल मल्टिमीडिया म्युझिकल फाऊंटन हे प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरणार आहे.दुसऱ्या टप्प्यात ३७ हजार चौरस मीटरवर मुख्य टेक्सटाईल म्युझियम उभारण्यात येणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या