Home / महाराष्ट्र / Maharashtra Elections 2025 : महाराष्ट्रात 247 पैकी 246 नगर परिषदांची निवडणूक, फक्त ‘या’ नगर परिषदेची प्रक्रिया थांबली; कारण काय?

Maharashtra Elections 2025 : महाराष्ट्रात 247 पैकी 246 नगर परिषदांची निवडणूक, फक्त ‘या’ नगर परिषदेची प्रक्रिया थांबली; कारण काय?

Patur Nagar Palika Election : महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, एकूण 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा...

By: Team Navakal
Maharashtra Elections 2025
Social + WhatsApp CTA

Patur Nagar Palika Election : महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, एकूण 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र, राज्यातील एका नगर परिषदेची निवडणूक सध्यातरी होणार नाहीये.

अकोला जिल्ह्यातील एकमेव पातूर नगर परिषदेच्या मतदारांना अजूनही निवडणुकीच्या प्रतीक्षेत राहावे लागणार आहे. हद्दवाढीच्या न्यायालयीन प्रकरणामुळेराज्य निवडणूक आयोगाने पातूर नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक प्रक्रिया रेंगाळल्याने आयोगाने पातूर वगळता राज्यातील इतर 246 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान आणि 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणीची घोषणा केली आहे.

पातूर नगरपालिकेची स्थिती

न्यायालयीन प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळा येत असला तरी, पातूर नगर परिषदेची आरक्षण सोडत मात्रकाढण्यात आली. आरक्षण सोडत झाल्यानंतर त्यावर आक्षेप मागवून अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक आयोग पातूर नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात पुढील निर्णय घेईल. पातूर वगळता अकोला जिल्ह्यातील इतर नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम नियोजित वेळेनुसार होईल.

इतर निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा

राज्यात जाहीर झालेल्या निवडणुकांसाठी 10 नोव्हेंबर 2025 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025 असून, 18 नोव्हेंबर 2025 रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2025 (अपील नसलेल्या ठिकाणी) तर 25 नोव्हेंबर 2025 (अपील असलेल्या ठिकाणी) असेल.

या निवडणुकीत एकूण 1,07,03,576 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. आयोगाने उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादाही वाढवली असून, ‘अ’ वर्ग नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी 15 लाख रुपये आणि सदस्यपदासाठी 5 लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

हे देखील वाचा – Jay Pawar : अजित पवारांचे चिरंजीव जय पवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार? चर्चांना उधाण; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Web Title:
संबंधित बातम्या