Home / महाराष्ट्र / Maharashtra News: सांगलीतील इस्लामपूर शहराचे नाव आता अधिकृतपणे ‘ईश्वरपूर’; राज्य सरकारने जारी केली अधिसूचना

Maharashtra News: सांगलीतील इस्लामपूर शहराचे नाव आता अधिकृतपणे ‘ईश्वरपूर’; राज्य सरकारने जारी केली अधिसूचना

Islampur Name Change : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहराचे नाव अखेर बदलण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली मागणी...

By: Team Navakal
Islampur Name Change
Social + WhatsApp CTA

Islampur Name Change : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहराचे नाव अखेर बदलण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली मागणी पूर्ण करत केंद्र सरकारने या नामांतराला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता इस्लामपूर शहराचे आणि नगर परिषदेचे नाव अधिकृतरित्या ‘ईश्वरपूर’ असे झाले आहे.

या निर्णयाची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. ते म्हणाले की, इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारसीसह केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधात निर्णय घेतला असून, 3 नोव्हेंबर 2025 रोजी गृह मंत्रालयाने या प्रस्तावास अंतिम मंजुरी दिली.

राज्य शासनाची अधिसूचना जारी

केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

या अधिसूचनेनुसार, “मौजे इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या गावाचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ असे करण्यात आले आहे. तसेच, ‘इस्लामपूर नगर परिषदेचे नाव आता ‘उरुण-ईश्वरपूर नगर परिषद’ असे करण्यात आले आहे.” या निर्णयामुळे आता सर्व शासकीय, प्रशासकीय आणि स्थानिक संस्थांच्या नोंदींमध्ये ‘ईश्वरपूर’ हे नाव वापरले जाणार आहे.

अनेक दशकांपासूनची मागणी पूर्ण

या नामांतराची मागणी गेल्या पाच दशकांपासून प्रलंबित होती. 1970 च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रमुख पंत सबनीस यांनी ही मागणी पहिल्यांदा केली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डिसेंबर 1986 मध्ये इस्लामपूर येथील सभेत “हे इस्लामपूर नव्हे तर हे ईश्वरपूर आहे,” असे वक्तव्य केले होते.

राज्य सरकारने जुलैमध्ये पावसाळी अधिवेशनात या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. आता अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, नामांतराचा हा शासकीय प्रवास पूर्ण झाला असून, भारतीय सर्वेक्षण विभाग, भारतीय डाक विभाग आणि भारतीय रेल्वे खात्यालाही त्यांच्या नोंदी बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे देखील वाचा – Raj Thackeray : “निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं!” नगरपरिषद निवडणूक घोषणेनंतर राज ठाकरेंचा संताप, आयोगावर गंभीर आरोप

Web Title:
संबंधित बातम्या