Prashant Jagtap Meet Sharad Pawar : निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्यात अनेक उलट फेर होताना दिसत आहे. आणि याच निमित्ताने अनेक भागात काही ना काही घोषणा होताना दिसतच आहे. अश्याच एका घोषणेने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. पुण्यात महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी (NCP Party) एकत्र येणार नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) सगळ्यांना महाविकास आघाडी (MVA) म्हणून लढण्याचं सांगितले असल्याची माहिती, शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दिली आहे.
सगळ्यांना महाविकास आघाडी म्हणून लढण्याचं सांगितलं आहे, त्यासाठी तयारी करा असे आदेश देखील शरद पवारांनी दिले असल्याचे जगतापांनी सांगितले. आज प्रशांत जगताप यांनी शरद पवारांसोबतच्या भेटीमध्ये पुणे शहराचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली बाजू मांडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याबाबत वाद सुरू आहे. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्थानिक पातळीवर दोन्ही गट एकत्र येण्याला कडाडून विरोध केला. त्यांनी दोन गट एकत्र आल्यास राजीनामा देण्याची भूमिका मांडली होती. याच पार्श्वभूमीवर आज ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रशांत जगताप यांची भेट झाली. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुण्यात एकत्र येणार नसल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय राज्यातही एकत्र येण्याबाबत अध्यक्ष पवार यांनी याच सूचना दिल्या आहेत.
यावेळी शरद पवारांकडून याबाबत अधिक स्पष्टता मिळाली आहे. पुण्यात आणि राज्यात आम्ही महानगरपालिकेच्या निवडणूका महाविकास आघाडी म्हणूनच लढू असे देखील ते म्हणले. तसेच शशिकांत शिंदे यांच्याशी देखील शरद पवार यांनी बातचीत केली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार असलयाचे सांगितलं आहे, असंही प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
तर पुढे प्रशांत जगतात सांगतात, सगळ्यांची मते शरद पवारांसमोर मांडली आहेत. शरद पवारांचा किंवा पक्षाचा वेगळा विचार नाही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाऊ, शशिकांत शिंदे हा निर्णय जाहीर करतीलच. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुणे महापालिकेची निवडणूक लढवू, असंही प्रशांत जगताप म्हणाले. त्यामुळे आता पुणे राष्ट्रवादीत दोन्ही गटांमध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा –
Air Fair Regulation : इंडिगोच्या गोंधळकाळात वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची थेट कारवाई?









