Home / महाराष्ट्र / Pune Crime Firing : पुण्यात बिश्नोई गँगचा थेट ‘फायनल वॉर्निंग’ गेम! एजे फर्निचर मॉलवर गोळीबार अन् शुभम लोणकरची ‘ती’ फेसबुक पोस्ट!

Pune Crime Firing : पुण्यात बिश्नोई गँगचा थेट ‘फायनल वॉर्निंग’ गेम! एजे फर्निचर मॉलवर गोळीबार अन् शुभम लोणकरची ‘ती’ फेसबुक पोस्ट!

Pune Crime Firing : कोयता गँगची दहशत आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत असलेल्या पुणे जिल्ह्यात आता...

By: Team Navakal
Pune Crime Firing
Social + WhatsApp CTA

Pune Crime Firing : कोयता गँगची दहशत आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत असलेल्या पुणे जिल्ह्यात आता आणखी एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत थेट कुप्रसिद्ध लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शार्प शूटर्सनी एका प्रसिद्ध मॉलवर गोळीबार (Gun Firing) केल्याची घटना काल रात्री घडली. रात्री साधारण ९ वाजून २४ मिनिटांच्या सुमारास घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिश्नोई गँगने शहरातील नामांकित ‘एजे’ (AJ) फर्निचर मॉलला लक्ष्य करत हा गोळीबार केला. या घटनेमुळे पंजाब आणि राजस्थानमधील बिश्नोई गँगने आता महाराष्ट्रात, विशेषतः पुणे-मुंबई परिसरात आपली दहशत आणि विस्तार कमालीचा वाढवला असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बाईकवरून आले अन् पाच ते सहा राऊंड झाडले: घटनेचा थरार
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री ९ वाजून २० मिनिटांच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून (बाईक) ‘एजे फर्निचर मॉल’च्या समोर आले. मॉलच्या आवारात पोहोचताच या दोघांनी त्यांच्या जवळील रिव्हॉल्व्हर काढून मॉलच्या दिशेने एकामागून एक तब्बल ५ ते ६ राऊंड फायर केले. हे सर्व वार मॉलच्या मुख्य नेमप्लेट आणि दर्शनी भागावर करण्यात आले. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर अत्यंत वेगाने दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे (Crime Branch) विशेष पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची नाकेबंदी करत फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरून रिकामी काडतुसे आणि इतर फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली असून परिसरातील संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश इंगवले यांनी दिली आहे.

शुभम लोणकरची फेसबुक पोस्ट: ‘हा केवळ ट्रेलर, पुढची गोळी डोक्यात!’
या गोळीबाराची अधिकृत जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगचा सक्रिय सदस्य असलेल्या शुभम लोणकर याने स्वीकारली आहे. गोळीबारानंतर काही वेळातच त्याने समाजमाध्यमावर (फेसबुक) एक पोस्ट करून या कृत्याची कबुली दिली. दरम्यान, पोलिसांनी ‘एजे फर्निचर मॉल’बाहेरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज ताब्यात घेऊन त्याची कसून तपासणी केली आहे. या फुटेजमध्ये दुचाकीवरील हल्लेखोर स्पष्टपणे मॉलच्या दिशेने गोळ्या झाडताना दिसत असून, या गोळीबारामुळे मॉलच्या दर्शनी भागाची मोठी काच फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिश्नोई गँगने या गोळीबारामागील कारणाचा दावा करताना फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘एजे’ फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन हे ‘एमडी’ (MD) ड्रग्सच्या तस्करी व्यवसायात गुंतलेले आहेत. हा केवळ एक ‘ट्रेलर’ आहे आणि जर सुधारणा झाली नाही, तर यापुढची थेट गोळी डोक्यात असेल, असा थेट आणि गंभीर इशारा बिश्नोई गँगकडून देण्यात आला आहे.

आरजू बिश्नोईची ऑडिओ क्लिप थेट समोर-
या प्रकरणाला आणखी एक गंभीर वळण मिळाले असून, या गोळीबाराच्या अनुषंगाने लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आरजू बिश्नोई याच्या नावाने एक कथित ऑडिओ क्लिप सध्या प्रसारित होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये, “जो कोणी आमच्या विरोधात जाईल, त्याची आणि आमची लवकरच अंतिम भेट होईल,” असा थेट धमकीवजा इशारा देण्यात आला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या