Home / महाराष्ट्र / Pune Weather Update: पुणेकरांसाठी गूड न्यूज! मुसळधार पाऊस थांबणार; हवामान विभागाकडून 5 ते 6 दिवसांचा नवा अंदाज जाहीर

Pune Weather Update: पुणेकरांसाठी गूड न्यूज! मुसळधार पाऊस थांबणार; हवामान विभागाकडून 5 ते 6 दिवसांचा नवा अंदाज जाहीर

Pune Weather Update: पुणे शहर आणि परिसरातील घाट माथ्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसानंतर आता पुणेकरांना...

By: Team Navakal
Pune Weather Update: पुणेकरांसाठी गूड न्यूज! मुसळधार पाऊस थांबणार; हवामान विभागाकडून ५ ते ६ दिवसांचा नवा अंदाज जाहीर
Social + WhatsApp CTA

Pune Weather Update: पुणे शहर आणि परिसरातील घाट माथ्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसानंतर आता पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुणे आणि आसपासच्या भागात पुढील 5 ते 6 दिवस मुसळधार पावसाची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांना पावसानी घेतलेल्या या विश्रांतीमुळे दिलासा मिळणार आहे.

हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई, पालघर, पुणे आणि पश्चिम घाटात मुसळधार पाऊस झाला होता. मात्र, आता ही हवामान प्रणाली मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने सरकली आहे. परिणामी, महाराष्ट्रातील विशेषतः पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. गेल्या आठवड्यात ज्या भागात 500 ते 600 मिमी पाऊस नोंदवला गेला होता, तिथे गेल्या 24 तासांत पावसाची केवळ रिपरिप पाहायला मिळाली.

घाट माथ्यावरील गेल्या २४ तासांतील पावसाची आकडेवारी

पुणे जिल्ह्यातील ज्या भागात काही दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस होत होता, तिथे गेल्या 24 तासांत नोंदवला गेलेला पाऊस अत्यंत कमी आहे:

  • ताम्हिणी: 12 मिमी
  • पोफळी: 12 मिमी
  • शिरगाव: 10 मिमी
  • डावडी: 10 मिमी

काही दिवसांपूर्वी या भागात अत्यंत भीषण पाऊस पडत होता, मात्र आता पावसाचा जोर अचानक आणि मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, मुसळधार पावसानंतर मान्सून काही काळासाठी विश्रांती घेतो आणि सध्याची परिस्थिती त्याच अंदाजानुसार आहे.

एल् निनो म्हणजे दुष्काळ नव्हे; हवामान तज्ज्ञांनी दूर केला गैरसमज

या वर्षाच्या मान्सूनबाबत बोलताना हवामान तज्ज्ञांनी नागरिकांमधील एक मोठा गैरसमज दूर केला आहे. अनेक लोकांचा असा समज असतो की, ज्या वर्षी समुद्रात ‘एल् निनो’ची स्थिती असते, त्या वर्षी नेहमीच दुष्काळ पडतो किंवा पाऊस कमी होतो. परंतु हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. एल् निनोच्या काळातही चांगला पाऊस पडतो, फक्त त्याचे वितरण असमान असते.

चालू हंगामाचा विचार केला तर उत्तर कोकण, पश्चिम कोकण, पुणे आणि नाशिक या भागात आतापर्यंत अतिशय चांगला पाऊस झाला आहे. याउलट मराठवाडा, लातूर आणि धाराशिव यांसारख्या भागांत मात्र पावसाची अजूनही 30 ते 40 टक्क्यांपेक्षा जास्त मोठी तूट जाणवत आहे.

पुढील ५ ते ६ दिवस कसे असेल पुण्याचे हवामान?

हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, पुण्यात पुढील 5 ते 6 दिवस मुसळधार किंवा अतिवृष्टीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. आठवडाभराच्या मुसळधार पावसानंतर मिळालेला हा दिलासा तात्पुरता असला तरी महत्त्वाचा आहे. मात्र, नैऋत्य मोसमी वारे अजूनही सक्रिय असल्याने जिल्ह्यातील काही दुर्गम आणि ठराविक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत राहतील.

Web Title:
संबंधित बातम्या