Home / महाराष्ट्र / सांगलीचे चांदोली राष्ट्रीय उद्यान ४ महिने पर्यटकांसाठी बंद!

सांगलीचे चांदोली राष्ट्रीय उद्यान ४ महिने पर्यटकांसाठी बंद!

सांगली– चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी (chandoli national park)काल सोमवारपासून बंद करण्यात आले आहे. यामुळे पर्यटकांना आता पुढील चार महिन्यांपर्यंत म्हणजे...

By: Team Navakal
chandoli national park

सांगली– चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी (chandoli national park)काल सोमवारपासून बंद करण्यात आले आहे. यामुळे पर्यटकांना आता पुढील चार महिन्यांपर्यंत म्हणजे १५ ऑक्टोबरपर्यंत याठिकाणी जाता येणार नाही,अशी माहिती वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील यांनी दिली.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची चांदोली येथील जंगल सफारी पर्यटनासाठी दरवर्षी पावसाळ्यात बंद केली जाते.व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील पर्यटन बंद असते.या वर्षाचा पर्यटन हंगाम १४ जून रोजी संपला आहे. पावसाळ्यात जंगलातील कच्चे रस्ते, नाले यामुळे वाहनांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध येतात. अशा परिस्थितीत दुर्घटना घडण्याची शक्यता असते . जंगलातील जैवविविधतेलाही वाहनांमुळे धोका निर्माण होतो. पावसाळा हा सरपटणारे प्राणी आणि अन्य वन्य जीवांचा प्रजननाचा कालावधी असतो.त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी पर्यटन बंद ठेवले जाते. दरवर्षी हा निर्णय वनविभाग घेत असते. त्यामुळे चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. आता १५ ऑक्टोबरनंतर हे उद्यान पर्यटकांसाठी खुले होणार आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या