Home / महाराष्ट्र / TCS Nashik Case: 25 दिवसांचा लपाछपीचा खेळ संपला! फरार निदा खान अखेर गजाआड; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

TCS Nashik Case: 25 दिवसांचा लपाछपीचा खेळ संपला! फरार निदा खान अखेर गजाआड; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

TCS Nashik Case: नाशिक येथील टीसीएस (TCS) संलग्न बीपीओ युनिटमध्ये गाजलेल्या लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा...

By: Team Navakal
TCS Nashik Case
Social + WhatsApp CTA

TCS Nashik Case: नाशिक येथील टीसीएस (TCS) संलग्न बीपीओ युनिटमध्ये गाजलेल्या लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या २५ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निदाला नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतले. या प्रकरणामुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून पोलीस यातील आंतरराष्ट्रीय धागेदोरे शोधत आहेत.

TCS Nashik Case: नेमके आरोप काय आहेत?

निदा खानवर पीडित महिलांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आणि मुख्य आरोपींना लैंगिक छळाच्या गुन्ह्यात मदत केल्याचा गंभीर आरोप आहे. विशेष तपास पथकाने (SIT) न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, निदाने पीडित महिलांना हिजाब आणि बुरखा घालण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. तसेच त्यांना काही धार्मिक मोबाईल ॲप्स डाऊनलोड करण्यास भाग पाडले होते. पीडितांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार करू नये म्हणून तिने दबाव आणल्याचेही तपासात समोर आले आहे.

TCS Nashik Case: तपासाची व्याप्ती वाढली

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून मालेगाव आणि थेट मलेशियापर्यंत पोहोचल्याचा संशय आहे. परदेशातील नोकरीच्या संधींचे आमिष दाखवून पीडितांचे धर्मांतर करण्याचा डाव होता का, याचा तपास आता एसआयटी करत आहे.

निदाने अटकपूर्व जामिनासाठी नाशिक न्यायालयात अर्ज केला होता, मात्र तिची कोठडीत चौकशी करणे आवश्यक असल्याचे सांगत न्यायालयाने तो फेटाळून लावला होता.

TCS Nashik Case: काय आहे टीसीएस नाशिक प्रकरण?

नाशिकमधील या कार्यालयात काम करणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील अनेक महिला कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये:

  1. लैंगिक छळ: कामाच्या ठिकाणी अश्लील कमेंट्स करणे, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे आणि विवाहाचे आमिष दाखवून शोषण करणे.
  2. धर्मांतराचा प्रयत्न: हिंदू देवतांचा अपमान करणे, कर्मचाऱ्यांना नमाज पठण आणि मांसाहार करण्यासाठी जबरदस्ती करणे.
  3. मानसिक छळ: वैयक्तिक आयुष्यावरून टोमणे मारणे आणि महिलांना सतत मानसिक दडपणाखाली ठेवणे.

TCS Nashik Case: आतापर्यंतची कारवाई

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दानिश शेख, तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी यांसह ९ जणांवर एफआयआर (FIR) नोंदवला आहे. यातील अनेक आरोपींना आधीच अटक करण्यात आली असून निदा खानच्या अटकेमुळे या प्रकरणाला आता मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, टीसीएस कंपनीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक स्वतंत्र समिती स्थापन केली असून अंतर्गत तपास सुरू केला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या