Home / महाराष्ट्र / मुंबईत पाळीव श्वानांसाठी आता कर भरणे बंधनकारक!

मुंबईत पाळीव श्वानांसाठी आता कर भरणे बंधनकारक!

मुंबई-मुंबई महानगरपालिकेने (BMC) घरात पाळीव कुत्रा (Dog) पाळण्यासंदर्भात नवीन नियमावली (new rules)जारी केली आहे. त्यानुसार आता पाळीव श्वानावर वार्षिक कर...

By: Team Navakal
BMC has issued new rules regarding keeping a pet dog
Social + WhatsApp CTA

मुंबई-मुंबई महानगरपालिकेने (BMC) घरात पाळीव कुत्रा (Dog) पाळण्यासंदर्भात नवीन नियमावली (new rules)जारी केली आहे. त्यानुसार आता पाळीव श्वानावर वार्षिक कर (Tax)भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय इमारतीतील घरमालक कुत्रा पाळत असल्यास याबाबत सोसायटीला पत्र देणे बंधनकारक आहे. पाळीव कुत्र्यासाठी केंद्राचा परवाना असणे बंधनकारक आहे. या नव्या नियमांमुळे कुत्रा पाळण्यावरून सोसायटीत (society) होणारे वाद टळणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

भटके कुत्रे आणि मांजरींना अन्न देणाऱ्या नागरिकांना त्रास देणे हा दंडनीय गुन्हा आहे. पाळीव श्वानासंदर्भात निश्चित करण्यात आलेले कर महानगरपालिकेकडे भरणे आणि पाळीव प्राण्यांच्या परवान्यासंदर्भातील नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालय तसेच भारतीय प्राणी कल्याण मंडळांच्या निर्देशांनुसार मालक, अन्न (Food)देणारे नागरिक, विविध संस्था इत्यादींसाठी पाळीव व भटक्या प्राण्यांसंदर्भात महापालिकेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे मुंबई महापालिकेच्या पशू वैद्यकीय आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर विस्तृतपणे उपलब्ध आहेत. या तत्त्वांचे काटकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या