Home / महाराष्ट्र / Uddhav Thackeray Shivsena MP : ठाकरेंच्या गोटातून आणखी एक मोठी विकेट पडणार?मातोश्री’वरील बैठकीला गैरहजर राहिलेल्या ‘त्या’ खासदाराची दिल्लीत गुप्त भेट..

Uddhav Thackeray Shivsena MP : ठाकरेंच्या गोटातून आणखी एक मोठी विकेट पडणार?मातोश्री’वरील बैठकीला गैरहजर राहिलेल्या ‘त्या’ खासदाराची दिल्लीत गुप्त भेट..

Uddhav Thackeray Shivsena MP : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या आगामी सत्तासमीकरणांच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याची जोरदार चर्चा सुरू...

By: Team Navakal
Uddhav Thackeray Shivsena MP 
Social + WhatsApp CTA

Uddhav Thackeray Shivsena MP : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या आगामी सत्तासमीकरणांच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रयत्न होत असल्याच्या या चर्चांमधेच, शिवसेना (उबाठा) पक्षाचे यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी दिल्लीत थेट शिंदे गटाच्या केंद्रीय मंत्र्याची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. खासदार संजय देशमुख यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. पक्षबदलाच्या आणि फुटीच्या चर्चा तीव्र असतानाच विरोधी छावणीतील मंत्र्याशी झालेली ही भेट अत्यंत संवेदनशील मानली जात होती. परंतु, या भेटीची पूर्वकल्पना आपण स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली असल्याचे सांगत खासदार संजय देशमुख यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ‘मातोश्री’ या आपल्या निवासस्थानी पक्षाच्या सर्व खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाच्या एकूण ९ खासदारांपैकी केवळ ४ खासदार प्रत्यक्ष हजर राहिल्याचे समोर आले. यावरून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. अनुपस्थित राहिलेले खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठू लागल्या. त्यातच, बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी खासदार संजय देशमुख यांनी शिंदे गटाच्या मंत्र्याची भेट घेतल्यामुळे शिवसैनिकांमध्ये त्यांच्या भूमिकेविषयी मोठा संभ्रम निर्माण झाला होता.

मतदारसंघातील विकासकामांसाठी भेट; उद्धव ठाकरेंना फोनवरून दिले स्पष्टीकरण
केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या या भेटीनंतर निर्माण झालेला संशय दूर करण्यासाठी खासदार संजय देशमुख यांनी तातडीने पावले उचलली. राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय देशमुख यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन करून या भेटीमागची पार्श्वभूमी आणि कारण स्पष्ट केले. आपल्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील एका महाविद्यालयाच्या प्रलंबित परवानगीच्या शासकीय कामानिमित्त आपण केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याचे त्यांनी पक्षप्रमुखांना सांगितले. रविवारी मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीला आपण प्रत्यक्ष हजर नसलो, तरी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होतो, असा दावा त्यांनी केला. केवळ जनहिताच्या आणि शैक्षणिक कामानिमित्त ही भेट झाली असून याला कोणताही राजकीय रंग न देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पाच खासदारांची अनुपस्थिती आणि संजय राऊतांचा दावा-
ठाकरे गटात सध्या अंतर्गत धुसफूस सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होण्याचे मुख्य कारण म्हणजे रविवारी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यानंतर आयोजित मुख्य बैठकीला पक्षाचे पाच प्रमुख खासदार अनुपस्थित राहिले होते. यामध्ये खासदार संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर या बड्या नेत्यांचा समावेश आहे. या खासदारांच्या अनुपस्थितीबाबत जेव्हा पक्षाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारणा केली, तेव्हा त्यांनी हे पाचही खासदार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ पद्धतीने बैठकीत सहभागी झाले होते, असे सांगत सारवासारव केली होती.

परंतु, अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पाच जणांपैकी केवळ नागेश पाटील आष्टीकर यांच्याशीच उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन चर्चा झाली. उर्वरित चार खासदारांनी पक्षप्रमुखांशी थेट संवादच साधला नसल्याचे समोर आल्याने संशयाचे वातावरण अधिक गडद झाले.

कार्यकर्त्यांमधील संभ्रम आणि आगामी बैठकीकडे लक्ष-
पक्षाचे महत्त्वाचे खासदार अशा प्रकारे ऐन वेळी बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सर्व अनुपस्थित खासदारांना कडक सूचना देत, आपण या बैठकीला प्रत्यक्ष का उपस्थित राहू शकलो नाही, याचे लेखी किंवा अधिकृत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या पाचही खासदारांनी आपापली वैयक्तिक व मतदारसंघातील कारणे पुढे करत स्पष्टीकरण सादर केले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या