Home / महाराष्ट्र / विश्रामबागवाडा जुलैअखेर पर्यटकांसाठी होणार खुला

विश्रामबागवाडा जुलैअखेर पर्यटकांसाठी होणार खुला

पुणे– शहरातील सदाशिव पेठेतील (Sadashiv Peth)ऐतिहासिक वारसा असलेला विश्रामबागवाडा (Vishrambaug)जुलैअखेरपर्यंत पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून विश्रामबागवाडा दुरुस्तीच्या...

By: Team Navakal
Vishrambaug Wada

पुणे– शहरातील सदाशिव पेठेतील (Sadashiv Peth)ऐतिहासिक वारसा असलेला विश्रामबागवाडा (Vishrambaug)जुलैअखेरपर्यंत पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून विश्रामबागवाडा दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे. त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

हेरिटेज सेलचे उपअभियंता (Deputy Engineer)सुनील मोहिते यांनी सांगितले की,विश्रामबाग वाड्यातील दालन क्रमांक एक व दोनचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. ते पर्यटकांसाठी (tourists) खुलेही करण्यात आले आहे. मात्र,मुख्य दर्शनी भाग जुलैअखेर सुरू केला जाणार आहे. दरम्यान,विश्रामबाग वाड्याचे जतन व संवर्धानाचे काम गेली दोन वर्षे महापालिकेच्या हेरिटेज सेलच्या माध्यमातून सुरू आहे.
या कामाला विलंब होत असल्याने काम पूर्ण न केल्यास आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पालिका प्रशासनाला दिला होता. त्यानंतर प्रशासनाने हे काम तातडीने पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या