Home / शहर / झेप्टोचे धारावीतील दुकान परवाना निलंबन अखेर मागे

झेप्टोचे धारावीतील दुकान परवाना निलंबन अखेर मागे

मुंबई- ऑनलाईन डिलिव्हरी फूड अ‍ॅप झेप्टोच्या धारावीतील दुकानावर १५ दिवसांपूर्वी लागू केलेला परवाना निलंबनाचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने रद्द...

By: Team Navakal

मुंबई- ऑनलाईन डिलिव्हरी फूड अ‍ॅप झेप्टोच्या धारावीतील दुकानावर १५ दिवसांपूर्वी लागू केलेला परवाना निलंबनाचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने रद्द केल्याचे झेप्टोने म्हटले. झेप्टोने आवश्यक सुधारणा कृती यशस्वीरीत्या अंमलात आणल्या व तसा अहवाल सादर केला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) अन्न सुरक्षा आयुक्त यांच्याकडून निलंबन मागे घेणारा आदेश काल जारी केला, असे झेप्टोने म्हटले आहे.

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार मागील आठवड्यात झेप्टोच्या धारावीतील दुकानात अन्न सुरक्षा तपासणी करण्यात आली होती. यावेळी झेप्टो प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अन्न सुरक्षा आणि मानके कायदा (२००६) आणि अन्न सुरक्षा आणि मानके (अन्न व्यवसायांचे परवाना आणि नोंदणी) नियम, २०११ चे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले होते. या तपासणीत काही अन्न उत्पादनांवर बुरशीची वाढ झाल्याचे आढळून आले होते. याव्यतिरिक्त ओल्या आणि अस्वच्छ जमिनीवर खाद्यपदार्थ साठवलेले होते. आणखी एका कारवाईत, एफडीएने पुण्यातील बालेवाडी येथील ब्लिंकिटच्या डार्क स्टोअरचा अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेतील त्रुटींसाठी अन्न व्यवसाय परवाना रद्द केला आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या