अलिबाग- अलिबाग कार्ले खिंड येथील वळणावर एसटी बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात आज सकाळी सातच्या सुमारास झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एका झाडाला बस अडकल्याने मोठा अनर्थ घडला .
अलिबाग एसटी बस आगारातून सकाळी अलिबाग पनवेल ही बस ४० प्रवाशांना घेऊन मुंबईकडे रवाना झाली होती. कार्ले खिंड येथील धोकादायक वळणावर बस आली असता बस दरीच्या दिशेने वळली. सुदैवाने बाजूला असलेल्या झाडाला बस अडकली, त्यामुळे अनर्थ टळला. बसमधील प्रवाशांना तातडीने बसच्या बाहेर काढण्यात आले. जखमींना अलिबाग रूग्णालयात दाखल करण्यात आले . अपघातात बसचा अक्सलही तुटला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, जिल्हा प्रशासन, एसटी प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते.