Home / News / गौरी गणपती सणासाठी एसटीच्या ४३०० गाड्या

गौरी गणपती सणासाठी एसटीच्या ४३०० गाड्या

मुंबई – गौरी गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा ४३०० एसटी बसेसची व्यवस्था केली आहे. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – गौरी गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा ४३०० एसटी बसेसची व्यवस्था केली आहे. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत असून या जादा गाड्या २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान सोडण्यात येणार आहेत.या एसटी गाड्यांसाठी व्यक्तिगत आरक्षण उपलब्ध असून त्याचबरोबर ७५ वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के तर महिलांना ५० टक्के सवलतही दिली जाणार आहे. २ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकातून या बसेस सोडण्यात येतील. या बसेससाठी गट आरक्षणही दिले जाईल. गेल्या वर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ३५०० गाड्या सोडल्या होत्या. त्यामध्ये यंदा ८०० बसेसची वाढ करण्यात आली आहे. या बसेसचे आरक्षण एसटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

Web Title:
संबंधित बातम्या