ट्रम्प यांच्यावरील फौजदारी खटल्यांची काळमर्याद रद्द

वॉशिंग्टन – अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झालेले डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात सुरु असलेल्या फौजदारी खटल्यांची सुनावणीसाठीची कालमर्यादा बाजूला ठेवण्याचा निर्णय अमेरिकेच्या न्यायमूर्तींनी घेतला आहे. ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेत असून त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.अमेरिकेच्या जिल्हा न्यायाधीश तान्या चुटकन यांनी वॉशिंग्टनमध्ये विशेष काऊंसिल जॅक स्मिथ यांची या सुनावणीची कालमर्यादा बाजूला ठेवण्याची विनंती मान्य केली. फिर्यादी पक्षाने ही सरकारला या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी वेळ मिळावा म्हणून ही कालमर्यादा बाजूला ठेवावी असे म्हटले होते. ट्रम्प यांच्या फौजदारी खटल्यांमध्ये न्यायालयीन धोरणांचाही विचार करावा लागणार आहे. १९७० सालच्या न्यायालयीन धोरणानुसार अमेरिकेच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात फोजदारी खटले चालवता येत नाहीत. रायटर्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेतील विधी व न्याय विभाग राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड़ ट्रम्प यांच्या विरोधातील फौजदारी खटल्यांचे काय करावे यावर विचारविनिमय करत आहे. ट्रम्प यांच्यावर सध्या चार फौजदारी खटले सुरु असून आपण निर्दोष असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. ज्यो बायडन यांचा विजय बदलण्याचा प्रयत्न, एका पोर्न स्टारला पैसे देणे आदी प्रकरणात हे खटले सुरु होते.