Home / News / तब्बल १०० मिनी एसी बसेस आणिक आगारात उभ्या

तब्बल १०० मिनी एसी बसेस आणिक आगारात उभ्या

मुंबई- मुंबई महापालिकेतील बेस्ट प्रशासनाच्या २८० पैकी तब्बल १०० मिनी एसी बसेस आणिक आगारात धूळ खात उभ्या आहेत. या सर्व...

By: E-Paper Navakal

मुंबई- मुंबई महापालिकेतील बेस्ट प्रशासनाच्या २८० पैकी तब्बल १०० मिनी एसी बसेस आणिक आगारात धूळ खात उभ्या आहेत. या सर्व गाड्या बेस्टने एम.पी. कंपनी या खासगी कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत.या गाड्या सध्या वापरात नसून बेस्टच्या मालकीच्या नाहीत.तरीही या गाड्या आगारात सडत उभ्या ठेवल्या आहेत.

बेस्टने कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या २८० मिनी एसी बसेस बेस्टच्या ताफ्यातून वजा झाल्या आहेत.कारण कंत्राटदाराच्या या बसेस खरेदी व्यवहाराचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.
सध्या बेस्टकडे एकूण ३१९६ बसगाड्या असून त्यापैकी मालकीच्या १०५६ तर भाडेतत्त्वावरील २१४० बसेस आहेत.यातील अनेक गाड्या कालमर्यादा संपल्याने भंगारात जात असतात.यावर्षी तर किमान ५०० गाड्या बंद ठेवाव्या लागणार आहेत.त्यामुळे बसेसचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अरुंद रस्त्यावरून धावणार्‍या फायदेशीर मिनी बसेस बंद पडत आहेत. कंत्राटदाराची देणी थकल्याने त्या गाड्या भंगारात चालल्या आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या