Home / News / तामिळनाडूत विद्यार्थ्यांमध्ये ‘कूल लीप’चे वाढते व्यसन

तामिळनाडूत विद्यार्थ्यांमध्ये ‘कूल लीप’चे वाढते व्यसन

चेन्नई – तामिळनाडूमध्ये शाळकरी मुलांमध्ये बंदी घातलेल्या कूल लीप या तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन वाढत आहे. याची गंभीर दखल मद्रास उच्च...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

चेन्नई – तामिळनाडूमध्ये शाळकरी मुलांमध्ये बंदी घातलेल्या कूल लीप या तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन वाढत आहे. याची गंभीर दखल मद्रास उच्च न्यायालयाने घेतली असून राज्याचे आरोग्य खाते, सरकारचे मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाला जबाबदार ठरविले आहे.
ऑनेस्टराजा नावाच्या इसमाकडून पोलिसांनी कूल लीपची २७ पाकिटे जप्त केली. त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला असून या खटल्यात आरोपीने जामिनासाठी केलेल्या अर्जावर न्या. भारत चक्रवर्ती यांच्या न्यायासनासमोर नुकतीच सुनावणी झाली. त्याप्रसंगी न्यायालयाने संबंधित सरकारी विभागांना जबाबदार ठरवून कूल लीपचे प्रसार रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचे आदेश दिले.

Web Title:
संबंधित बातम्या