Home / News / तो पुन्हा येतोय ! आमदाराकडून फडणवीसांचा व्हिडीओ पोस्ट

तो पुन्हा येतोय ! आमदाराकडून फडणवीसांचा व्हिडीओ पोस्ट

मुंबई – अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ एक्सवरून पोस्ट केला आहे....

By: E-Paper Navakal

मुंबई – अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ एक्सवरून पोस्ट केला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार, यावरून महायुतीत चुरस निर्माण झाली आहे. मात्र, सर्वाधिक जागा भाजपाने जिंकल्या असल्याने देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावे, असे भाजपा आमदारांना वाटत असताना भाजपाचे सचिन कल्याणशेट्टी यांनी “नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तो पुन्हा येतोय” या मजकुरासह देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला आहे. यात फडणवीस २.०६ मिनिटांच्या व्हिडिओत गेल्या काही वर्षातील विविध वृत्तपत्रांतील बातम्यांच्या कात्रणांच्या माध्यमातून फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला सर्वाधिक जागा कशा मिळवून दिल्या, याचा आलेख मांडला आहे. पार्श्वभूमीवर सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कविता आहे.

Web Title:
संबंधित बातम्या