नाशिक जिल्ह्यातील पुरामुळे जायकवाडीचा साठा वाढला

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील पुरामुळे जायकवाडीचा साठा वाढलानाशिकनाशिक जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे भरली असून त्यातून होणाऱ्या विसर्गामुळे या भागातील नद्यांना पूर आले. या पुराचा फायदा थेट मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला झाला असून या धरणातील पाणीसाठा वाढून २० टक्क्यांवर पोहोचला आहे.नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील आठ धरणांमधून विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे १० टीएमसी पाणी रवाना झाले. या पाण्यामुळे जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून त्यामुळे मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटणार आहे. नाशिकमधील गंगापूर, दारणा, पालखेड धरणातील पाणी पुढे नांदूरमध्यमेश्वर मार्गे जायकवाडीकडे जाते. कालपासून नांदूर मध्यमेश्वरमधून ५४ हजार २३३ क्यसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जायकवाडीचा पाणीसाठा वाढला आहे. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी, पालखेड, करंजवण, वाघाड, ओझरखेड या धरणातून विसर्ग सुरु आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top