Home / News / नीलम गोऱ्हे यांना  कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा  

नीलम गोऱ्हे यांना  कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा  

मुंबई – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आले आहे. डॉ. गोऱ्हे २००२ पासून विधानपरिषदेच्या सदस्या आहेत. सलग चार वेळा त्या विधानपरिषदेवर निवडून आल्या आहेत.  

नीलम गोऱ्हे सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत.  विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. यापूर्वी ऑगस्ट १९५५ ते एप्रिल १९६२ दरम्यान जे. टी. सिपाही मलानी यांनी हे पद भूषवले होते.

Web Title:
संबंधित बातम्या