बुलढाण्यामध्ये बस-ट्रकच्या धडकेत २ जण गंभीर जखमी

बुलढाणा – छत्रपती संभाजीनगर-नागपूर महामार्गावरील सिंदखेड तालुक्यातील किनगांव राजा येथे बस आणि ट्रकमध्ये झालेल्या धडकेत काल रात्री २ जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर बसमधील इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही प्रवासी बस छत्रपती संभाजीनगरवरून रिसोडच्या दिशेने जात होती. तर ट्रक मेहकरवरून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होता. दोन्ही वाहने सिंदखेड तालुक्यातील किनगांव राजा येथील पेट्रोल पंपाजवळ आली असता त्यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. त्यासोबत महामार्गावर वाहतूक कोंडी देखील झाली होती. या अपघातात २ जण गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये ट्रक चालकाचा देखील समावेश आहे. अरमान एस.शेख असे जखमी ट्रक चालकाचे नाव असून ते छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत.