मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई- विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगरीय वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे. हे काम सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर चालणार आहे. त्यामुळे सीएसएमटी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत अप जलद मार्गावरील गाड्या धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

त्याचबरोबर हा मेगाब्लॉक हार्बर रेल्वे मार्गावरील सीएसएमटी- चुनाभट्टी/वांद्रे डाउन आणि अप मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० या वेळेत असणार आहे. परिणामी सीएसएमटी/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी, बेलापूर, पनवेलसाठी हार्बर मार्गावरील सेवा सुरू राहील. तसेच वांद्रे, गोरेगाव येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत डाउन प्रवाशांना मेगाब्लॉक कालावधीत १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करता येईल.

Scroll to Top