मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. मेगाब्लॉक दरम्यान अनेक गाड्या उशिराने धावतील तसेच अनेक गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी लोकलचे वेळापत्रक पाहून घराबाहे पडावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

हार्बर मार्गावर विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ५व्या आणि ६ व्या मार्गिकेवर सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून सुटणाऱ्या/येणाऱ्या डाऊन आणि अप मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान अनुक्रमे डाऊन आणि अप जलद मार्गांवर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील. मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.२८ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४५ या वेळेत सीएसएमटी येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-मानखुर्द मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० या कालावधीत ट्रान्स हार्बर/मुख्य मार्गांवर प्रवास करण्याची परवानगी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top