मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ६ महिन्यात ७० अपघात; ३७ मृत्यू

पुणे : मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर गंभीर अपघातांमूळे मृत्युच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यात येथे ७० अपघात झाले असून, यातील काही गंभीर अपघातांमध्ये ३७ लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यास सरकारच्या योजना अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
२०१८ मध्ये एकूण ३५९ अपघात झाले होते. त्यातील १०० प्राणांतीक अपघातामध्ये ११४ मृत्यु झाले होते. तर २०१९ मध्ये ३५३ एकूण अपघात होऊन ७४ प्राणांतीक अपघातामध्ये ९२ मृत्यु झाले. त्यानंतर २०२०-२०२१ मध्ये कोरोना महामारीच्या लाॅकडाऊनमूळे अपघातामध्ये घट झाली होती. मात्र २०२२ मध्ये पुन्हा वर्षभरात १९८ अपघात झाले. यात ९२ लोकांनी आपला जीव गमवला. त्यांनतर अपघातांच्या संख्येत वाढ होत असून यावर्षी जानेवारी ते जुन या सहा महिन्यात सुद्धा चिंताजनक अपघात आणि मृत्युची आकडेवारी पुढे आली आहे. एकूण ७० अपघात झाले असून, २६ प्राणांतीक अपघातामध्ये ३७ लोकांचा बळी गेला आहे. त्यामूळे येत्या काळात राज्य सरकारने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ठोस उपाययोजना न केल्यास येत्या सहा महिन्यात पुन्हा अपघाताची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top