मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर खासगी बस आगीत भस्मसात!

पुणे

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळील आढे गावच्या हद्दीत एका खासगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने बसने पेट घेतला. ही दुर्घटना आज सकाळी ७ च्या सुमारास घडली. या बसमध्ये ३६ प्रवासी होते. बसचालक आणि प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बस रिकामी केल्याने मोठी जीवितहानी टाळली. मात्र या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली.

आज सकाळच्या सुमारास मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाक्याजवळील आढे गावच्या हद्दीत मुंबईहून – पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसचा टायर फुटला. त्यानंतर बसने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच आयआरबी पॅट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा, वडगाव नगरपंचायत अग्निशमन दल आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. यावेळी सुमारे सव्वा तासानंतर आग आटोक्यात आली. मात्र यात बस पूर्णपणे जळून भस्मसात झाली. बसचा टायर फुटून शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top