Home / News / अक्षय कुमारला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण

अक्षय कुमारला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण

मुंबई बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमार गेल्या दोन दिवसांपासून तो ‘सरफिरा’ या आगामी हिंदी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमार गेल्या दोन दिवसांपासून तो ‘सरफिरा’ या आगामी हिंदी चित्रपटच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. प्रमोशन दरम्यानच त्याला कोरोनाची लागण झाली. तब्येत ठीक नसल्यामुळे त्याने कोरोनाची चाचणी केली. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अक्षयने स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले आहे. तो सध्या डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आहे. कोरोनाची लागण झाल्याने अक्षय उद्योजक मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या लग्नाला उपस्थित राहणार नाही.

Web Title:
संबंधित बातम्या