Home / Top_News / अभिनेता राजपाल यादव याची उत्तर प्रदेशातील मालमत्ता जप्त

अभिनेता राजपाल यादव याची उत्तर प्रदेशातील मालमत्ता जप्त

मुंबई – हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव याची उत्तर प्रदेशातील शहांजहानपूर शहरातील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता बँकेने जप्त केली...

By: E-Paper Navakal

मुंबई – हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव याची उत्तर प्रदेशातील शहांजहानपूर शहरातील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता बँकेने जप्त केली आहे. २०१२ साली त्याच्या वडिलांच्या नावावर घेतलेल्या कर्जाची परतफेड करु न शकल्यामुळे ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.अभिनेता राजपाल यादव याने २०१२ साली ‘अता पता लपता’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यावळी त्याने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वांद्रे शाखेतून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. यासाठी त्याने शहाजहांपूर येथील सेठ इन्क्लेव्ह मध्ये असलेली मालमत्ता तारण ठेवली होती. या कर्जाची परतफेड करता न आल्यामुळे ही मालमत्ता जप्त करत असल्याची नोटीस बँकेने या मालमत्तेवर लावली आहे. या मालमत्तेसंदर्भात कोणीही व्यवहार करु नयेत असा इशाराही देण्यात आला आहे. या संदर्भात राजपाल यादव याने आतापर्यंत आपली प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही. २०१८ सालीही दिल्लीस्थित एका कंपनीचे कर्ज न फेडल्याबद्दल त्याला तुरुंगात जावे लागले होते.

Web Title:
संबंधित बातम्या