Home / News / अभिनेता सलमान खानला गाण्यावरून नवी धमकी

अभिनेता सलमान खानला गाण्यावरून नवी धमकी

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खानला येणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. आता...

By: E-Paper Navakal

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खानला येणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. आता पुन्हा एकदा सलमान खानला बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याचा धमकी वजा मेसेज मिळाल्याची माहिती आहे. मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला काल रात्री १२ वाजताच्या सुमारास सलमान खानसाठी धमकीचा मेसेज मिळाला होता .

धमकीच्या मेसेजमध्ये सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोईवर लिहिण्यात आलेल्या गाण्याचा उल्लेख केला असून ज्याने कोणी गाणे लिहिले आहे त्याला आम्ही सोडणार नाही, फक्त एकच महिना… एकाच महिन्याच्या आत गाणे लिहिणाऱ्या व्यक्तिला मारणार, गाणे लिहिणाऱ्याची हालत अशी करणार की तो यापुढे नव्याने गाणे लिहूच शकणार नाही, सलमान खानमध्ये दम असेल तर त्याने त्या गाणे लिहिणाऱ्याला वाचवावे… लॉरेन्स बिष्णोई गँग, असा मजकूर मेसेज मध्ये नमूद आहे.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts