अमेरिकेतील गायिका पाउला अब्दुलचा निर्मात्यावर लैंगिक छळाचा आरोप

कॅलिफोर्निया – अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका पाउला अब्दुल अमेरिकन आयडॉलचा कार्यकारी निर्माता आणि ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’चा जज निगेल लिथगो याच्याविरोधात तक्रार केली आहे.
लिथगोने तिचा ‘लैंगिक छळ’ केल्याचा आरोप करत पाउला अब्दुलने खटला दाखल केला आहे. पाउलाने कॅलिफोर्नियाच्या लैंगिक शोषण कायद्याची मुदत संपण्याच्या ७२ तासांपूर्वीच हा खटला दाखल केला आहे. तिने आरोप केला आहे की अमेरिकन आयडॉलच्या सुरुवातीच्या सीझनमध्ये निगेलने लिफ्टमध्ये तिच्याशी गैरवर्तन केले होते. त्यावेळी तिने तिथून पळ काढला.
निगेल हा टीव्ही शोचा प्रसिद्ध निर्माता आहे. त्याच्याबद्दल काही बोलले तर आपले करिअर संपेल, या भीतीने ती निगेलविरुद्ध इच्छा असूनही काही बोलली नाही, असे पाउलाचे म्हणणे आहे. या आरोपाबाबत निगेलने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top