अमेरिकेत पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने! भारतीय विद्यार्थिनीला अटक

वॉशिंग्टन – अमेरिकेतील प्रिन्सेस्टन विद्यापीठाच्या आवारात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शानामध्ये सामील झाल्याबद्दल एका भारतीय वंशाच्या विद्यार्थीनीला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून तोपर्यंत तिला विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.
अचिंत्या शिवलिंगम असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. तिचा जन्म तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये झाला आहे. मात्र ओहिओतील कोलंबसमध्ये ती लहानाची मोठी झाली आहे.
गाझा पट्टीत सध्या सुरू असलेल्या इस्त्रायल – हमास युध्दाच्या निषेधार्थ अमेरिकेतील अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी निदर्शने करीत आहेत. याच प्रकारची निदर्शने प्रिन्सेस्टन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गेल्या मंगळवारी केली होती. त्यामध्ये सामील झाल्याबद्दल अचिंत्या आणि अन्य एक भारतीय विद्यार्थी हसन सय्यद याला पोलिसांनी अटक केली .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top