अमेरिकेत पॅलेस्टिनींची निदर्शने विमानतळ, महामार्ग रोखले

शिकागो – पॅलेस्टाईन समर्थकांनी सोमवारी अमेरिकेच्या अनेक शहरांत उग्र निदर्शने केली. इलिनॉईस, कॅलिफोर्निया, न्यू यॉर्क आणि पॅसिफीक नॉर्थवेस्टमध्ये निदर्शकांनी रत्यांवर उतरून जोरदार आंदोलन केले. आंदोलकांनी विमानतळ आणि महत्वाच्या महामार्गावरील वाहतूकही काही काळ रोखून धरली.
जगभरातून पॅलेस्टाईनची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या निषेधार्थ ही निदर्शन करण्यात आली, असे रिफका फालानेह यांनी सांगितले. फालानेह हे या आंदोलनातील म्होरक्यांपैकी एक आहेत.
आंदोलकांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बे परिसरातील गोल्डन गेट येथे रस्त्यांवरील वाहतून रोखून धरली. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही आंदोलकांनी मोठया आकाराच्या सिमेंट भरलेल्या ड्रमना साखळीने बांधून घेतले होते. ब्रुकलीन ब्रिजवर उतरलेल्या आंदोलकांनी वाहतूक रोखून धरल्याने वाहतूक कोंडी झाली. युगेन आणि ओरेगॉन या राज्यांमध्ये आंदोलकांनी महत्वाचे महामार्ग रोखून धरले.
इस्त्राईल आणि हमास यांच्यामध्ये सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष थांबवावा,अशी आंदोलकांची मुख्य मागणी होती. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने दक्षिण इस्त्राईलमध्ये हल्ला केल्यापासून युध्दाला विरोध करणारे पॅलेस्टीनी नागरिक अमेरिकेत सातत्याने निदर्शने करीत आहेत.हमासने केलेल्या हल्ल्यात तब्बल बाराशे निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्राईलने गाझा पट्टीत केलेल्या हल्ल्यांमध्ये ३३ हार ७०० पॅलेस्टीनी नागरिकांचा बळी गेला,असा दावा गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top