Home / News / आजपासून तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस

आजपासून तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस

मुंबई – राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उद्या २७,,२८ आणि २९ डिसेंबर रोजी गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उद्या २७,,२८ आणि २९ डिसेंबर रोजी गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.उद्या शुक्रवार २७ डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल.उद्या रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावणार आहे.तसेच २८ डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल.यात यवतमाळ,
वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे.तर २९ डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाण वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पहिला मिळेल, आणि ३० डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल.

Web Title:
संबंधित बातम्या