Home / News / आयुष्यमान भारत समितीच्या अध्यक्षपदी डॉ. शेटेंची नियुक्ती

आयुष्यमान भारत समितीच्या अध्यक्षपदी डॉ. शेटेंची नियुक्ती

मुंबई – राज्य सरकारकडून ‘आयुष्यमान भारत, मिशन महाराष्ट्र’ समितीचे पुर्नगठन करण्यात आले आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्य सरकारने डॉ.ओमप्रकाश शेटे...

By: E-Paper Navakal

मुंबई – राज्य सरकारकडून ‘आयुष्यमान भारत, मिशन महाराष्ट्र’ समितीचे पुर्नगठन करण्यात आले आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्य सरकारने डॉ.ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये शेटेंसह सहा सदस्यांचा समावेश आहे. राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत.
देवेंद्र फडणवीस २०१४ -२०१९ दरम्यान मुख्यमंत्री असताना डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीची जबाबदारी होती. वेळी राज्यातल्या योजनेंचा लाभ गरजू लोकांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. त्यानंतर डॉ. ओमप्रकाश शेटे हे तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचे ओएसडी होते.

Web Title:
संबंधित बातम्या